Champions Trophy 2025 Indian Cricket Team नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मान असल्यानं बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याची माहिती आहे. भारतीय संघान त्रयस्थ ठिकाणी सामन्यांचं आयोजन करण्यात यावं, अशी भूमिका घेतलीय. भारताच्या भूमिकेवर अद्याप आयसीसी अथवा पीसीबीकडून कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. भारताच्या मागणीवर निर्णय न झाल्यास टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेण्याच्या पर्यायावर देखील विचार करु शकते. जर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास स्पर्धा कशी होणार हे पाहावं लागेल.
पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीचं प्रस्तावित वेळापत्रक आयसीसीला सादर केलं आहे. भारताचे सर्व सामने सुरक्षेच्या दृष्टीनं लाहोरमध्ये आयोजित करण्याचा पीसीबीचा दौरा प्रस्तावित आहे.मात्र, भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता कमी असल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. बीसीसीआयकडून देखील यासंदर्भात अधिकृतपणे काही मांडण्यात आलेलं नाही.
भारत स्पर्धेतून माघार घेणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे बीसीसीआयची मागणी मान्य करणं किंवा अमान्य करणं असे दोन पर्याय असतील. जर, बीसीसीआयनं आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यास आणि पीसीबीनं देखील लाहोरमध्येच सामने घेण्याचा निर्णय घेतल्यास भारतीय संघ स्पर्धेतून माघार घेऊ शकतो.
भारतानं माघार घेतल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीत 7 संघ राहतील. गेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत आठव्या स्थानापर्यंत असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्राफीत स्थान मिळतं. तर, बांगलादेश आठव्या स्थानावर असल्यानं त्यांना प्रवेश मिळाला आहे. तर, श्रीलंका नवव्या स्थानावर होती. आता जर भारतानं माघार घेतली तर चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रीलंकेला स्थान मिळू शकतं.
चॅम्पियन्स ट्राफीत भारत खेळणार की नाही? अनिश्चितता कायम
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्राफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं भारत चॅम्पियन्स ट्राफीसंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल. भारतानं जरी पाकिस्तानला क्रिकेट खेळण्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला असता तरी गेल्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये ते भारतात आले होते. आता भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील समावेश बीसीसीआय काय भूमिका घेणार याकडे लागलेला असेल.
संबंधित बातम्या :
आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग, कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?