Team India chances in WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) इंदूर कसोटीतील (Indore Test) पराभवानंतर भारतीय संघाच्या (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत (WTC Final) पोहोचण्याच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. आता भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेतील अखेरची टेस्ट म्हणजेच अहमदाबाद येथे होणारी शेवटची कसोटी जिंकावी लागेल आणि WTC अंतिम फेरी गाठावी लागेल. त्यामुळे गुणतालिका पाहता भारतीय संघ जरी हा सामना जिंकला नसला तरी WTC फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या त्याच्या आशा कायम आहेत. तसंच अखेरचा सामना भारत जिंकण्यात अपयशी ठरला तरी भारताच्या WTC Final मध्ये एन्ट्रीची शक्यता कायम असेल, त्या स्थितीत भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.


इंदूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ( WTC Final 2023) प्रवेश केला आहे. दुसऱ्या संघासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात शर्यत आहे. 9 मार्चपासून सुरु होणारी अहमदाबाद कसोटी भारतीय संघाने जिंकल्यास डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियासमोर (IND vs AUS in WTC Final) असेल. पण अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा भारताचा पराभव झाल्यास, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंका संघाने न्यूझीलंडला 2-0 ने पराभूत केल्यास, श्रीलंका WTC अंतिम फेरीत पोहोचेल. म्हणजेच अहमदाबाद कसोटीचा निकाल काहीही लागला तरी श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकू शकला नाही, तरच भारतीय संघ WTC फायनल खेळेल. दरम्यान न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 ने जिंकणं श्रीलंकेला बऱ्याच प्रमाणात अशक्य आहे. कारण ही कसोटी मालिका फक्त न्यूझीलंडमध्ये खेळवली जाणार आहे आणि अलीकडेच न्यूझीलंडने फॉलोऑन खेळूनही इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकला आहे. त्यामुळे ते चांगल्या फॉर्मात असून न्यूझीलंडचा संघ कसोटीत श्रीलंकेपेक्षा बलाढ्य आहे.


WTC फायनल फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातच होणार!


संपूर्ण समीकरणं पाहिल्यास डब्ल्यूटीसी फायनलमध्ये (WTC Final 2023) भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ समोरासमोर असतील, असे सहज म्हणता येईल. कारण न्यूझीलंडविरुद्धची (New Zealand vs Sri Lanka) कसोटी मालिका जिंकणं श्रीलंकेसाठी खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत लंडनच्या 'द ओव्हल'मध्ये 7 ते 11 जून या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघच हा शानदार आणि महत्त्वाचा सामना खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे.


हे देखील वाचा-