Rickey Ponting on David warner : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील दिग्गज सलामीवीर डेविड वॉर्नर (David warner) जगातील अव्वल दर्जाच्या फलंदाजात मोडतो. कसोटी, वन-डे आणि टी20 अशा तिन्ही क्रिकेट प्रकारात त्याने कमाल कामगिरी केली आहे. पण त्याची कसोटी कारकीर्द आता संपण्याच्या वाटेवर आहे का? हा प्रश्न माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या (Rickey Ponting) एका वक्तव्यातून समोर आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND vs AUS Test) सुरु कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापूर्वीच एल्बो इंज्युरीमुळे वॉर्नर मालिकेतून बाहेर पडला. दरम्यान खास फॉर्मात नसताना अशाप्रकारे मालिकेमधूनच संघाबाहेर जाण्यामुळे कदाचित परत तो कसोटी संघात जागा मिळवू शकणार नाही आणि त्याच्या महान कसोटी कारकिर्दीचा शेवट ही खास होणार नाही अशी शक्यता पॉटिंगन वक्तव्य केली आहे.


काय म्हणाला पॉटिंग?


पॉटिंगने वॉर्नरबद्दल बोलताना तो म्हणाला, "वॉर्नरचं अशाप्रकारे खास फॉर्मात नसताना मालिकेमधूनच संघाबाहेर जाण्यामुळे त्याचं पुनरागमन अवघड झालं आहे. त्यात अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यात त्याने तीन डावात 1,10 आणि 15 अशी खराब खेळी केली. वॉर्नरने 2019 च्या ऍशेसमध्ये देखील केवळ 9.5 च्या सरासरीने रन केले होते. त्यामुळे तो आता खास फॉर्मात नसल्याचं दिसत आहे. काही दिवंसापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने मायदेशात द्विशतक झळकावलं होतं. आपल्या 100 व्या कसोटीत शतकी खेळी करणारा तो दहावा फलंदाज ठरला. त्याने त्यावेळीच आपल्या कसोटी कारकिर्दीबाबत विचार करायला होता. आता अशाप्रकारे खास फॉर्मात नसताना संघाबाहेर गेल्यानंतर त्याच्या कसोटी कारकिर्दीला हवी तशी सांगता मिळणार नाही. आगामी अॅशेसमध्येही त्याच्या संघात असण्यावर शंका आहे. कारण त्याच्या जागी संघात आलेल्या ट्रेव्हीस हेडने चांगली कामगिरी केल्याचं दिसून येत आहे''


तिसऱ्या कसोटी भारत 9 विकेट्सने पराभव


तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी निवडल्यावर पहिल्या दिवशी भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत कांगारुंनी सर्वबाद केलं. ज्यानंतर पहिल्या दिवशी एकूण 4 आणि दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर उर्वरीत 6 विकेट्स घेत भारताने 197 धावांत ऑस्ट्रेलियाला रोखलं. ज्यानंतर 88 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेला भारत दुसऱ्या डावातही 163 धावाच करु शकला. पुजाराच्या 59 धावांमुळे भारताने किमान इतकी धावसंख्या केली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने तब्बल 8 तर मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमनने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारत सर्वबाद झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला ज्यानंतर तिसऱ्या दिवशी 76 धावांची गरज कांगारुंना विजयासाठी होती. तिसऱ्या दिवशी पहिल्या षटकात एक विकेट गमावल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेन आणि हेड यांनी स्फोटक फलंदाजी करत सहज विजय संघाला मिळवून दिला.


हे देखील वाचा-