बारबाडोस: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वातील टीम इंडियानं (Team India) यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2024) दमदार कामगिरी केली आहे. भारतानं पहिल्यांदा ग्रुप स्टेजमध्ये तीन मॅच जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक गटात पाच संघ या प्रमाणं विभागणी करण्यात आली होती. भारतासोबत अ गटात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयरलँडचा संघ होता. टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतलेल्या 20 संघांपैकी 12 संघांचा प्रवास संपणार आहे. यानंतर सुपर 8 च्या लढती सुरु होतील. भारतासह इतर सात संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आता सेमी फायनलमधील प्रवेशापासून दोन पावलं दूर आहे.
सुपर 8 मध्ये प्रवेश केलेल्या आठ संघांची विभागणी दोन गटात करण्यात आलेली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ यांचा एक गट आहे. तर, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे एका गटात असतील.
भारताच्या सुपर 8 मध्ये तीन मॅचेस आहेत. यापैकी दोन संघांविरोधातील मॅच निश्चित झाल्या आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध भारत 20 जूनला लढणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ लढेल. भारत विरुद्ध बांगलादेश अशी मॅच होण्याची शक्यता आहे. ही मॅच 22 जूनला होणार आहे. अँटीग्वामध्ये भारताची सुपर 8 मधील दुसरी मॅच असेल. यानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच सेंट ल्यूसिया मध्ये 24 जूनला होणार आहे. भारताला सुपर 8 मध्ये केवळ दोन मॅच जिंकल्यास सेमी फायनलचं तिकीट मिळणार आहे.
विराट अन् रोहित शर्माच्या कामगिरीवर लक्ष
विराट कोहलीला ग्रुप स्टेजमध्ये फलंदाजी करताना यश मिळालेलं नाही. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना सुपर 8 मध्ये महत्त्वाच्या सामन्यांमध्ये फॉर्म गवसल्यास याचा भारताला फायदा होऊ शकतो. सुपर 8 मध्ये तीन पैकी दोन मॅच जिंकल्यास भारताचा सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित आहे.
भारतीय संघात बदल होणार?
भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यानं ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या तीन मॅचेस संघात कोणत्याही प्रकारचा बदल केला नव्हता. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली होती. त्यामुळं भारतीय संघ सुपर 8 मध्ये देखील कोणताही बदल न करता खेळू शकतो. भारताच्या गोलंदाजांनी ग्रुप स्टेजमध्ये चागंली कामगिरी केली होती. तिच कामगिरी कायम ठेवल्यास भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो.
संबंधित बातम्या :
Smirti Mandhana: मराठमोळ्या स्मृती मानधनानं मैदान गाजवलं, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं