चेन्नई: भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका (IND W vs SA W) महिला संघाची एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. यातील पहिली लढत बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम वर सुरु आहे. भारताची कॅप्टन हरमनप्रीतन कौर हिनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 265 धावा केल्या. यामध्ये भारताची सलामीवीर स्मृती मानधना (Smirti Mandhana) हिनं शतक झळकावलं. स्मृतीच्या शतकाच्या जोरावर भारतानं ही धावसंख्या गाठली. स्मृती मानधनानं हिनं 127 बॉलमध्ये 117 धावा केल्या. यामध्ये तिनं 12 चौकार आणि 1 षटकार मारला.
मराठमोळ्या स्मृती मानधना हिनं शतक झळकावलं मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले. दीप्ती शर्मा हिनं 48 बॉलमध्ये 37 धावा केल्या. याशिवाय भारताच्या संघातील इतर खेळाडू मोठी धावसंख्या करु शकल्या नाहीत.शेफाली वर्मा, दयालन हेमलथा, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज,, ऋचा घोष यांनी निराशाजनक कामगिरी केली. पूजा वस्त्राकर हिनं 42 बॉलमध्ये 31 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाखा हिनं चांगली कामगिरी केली. आयाबोंगा खाखा यांनी 10 ओव्हरमध्ये 47 धावा देत 3 विकेट घेतल्या. सबाता कलास हिनं 2 विकेट घेतल्या. अन्नेरी डेर्कसेन आणि नोंदुमिसो शेंगेज यांनी 1-1 विकेट घेतली.
भारताची खराब सुरुवात
टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवर शेफाली वर्मा 12 बॉलमध्ये 7 धावा करुन बाद झाली. यानंतर दायालन हेमलाथा 16 बॉलमध्ये 12 धावा करुन बाद झाली. भारताची कॅप्टन हरमनप्रीत कौर 11 बॉलमध्ये 10 धावा करुन बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्स चांगली कामगिरी करेल, अशी आशा असताना तिनं देखील निराश केलं. तिनं 28 बॉलमध्ये 17 धावा केल्या.
भारतानं केलेल्या 265 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या 15 ओव्हरमध्ये 3 विकेटवर 45 धावा झाल्या होत्या.
दरम्यान, स्मृती मानधनाचं हे सहावं शतक ठरलं आहे. भारतातील हे तिचं पहिलं शतक आहे. भारताकडून वनडे मॅचमध्ये सर्वाधिक करणारी दुसरी खेळाडू ठरली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक झळकवणारी स्मृती मानधना ही पहिली खेळाडू ठरली आहे. आरसीबीनं स्मृती मानधनाच्या शतकाबाबत एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये स्मृतीच्या फोटोवर द क्वीन्स गॅम्बिट असं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा!