Team India at Mahakaleshwar Mandir : सध्या भारत न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) एकदिवसीय मालिका खेळत असून तिसऱ्या वन-डे पूर्वी भारतीय खेळाडू (Team India) जगप्रसिद्ध अशा बाबा महाकालेश्वरच्या मंदिरात पोहोचले आहेत. यावेळी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि भारतीय क्रिकेट संघाशी संबधित काही कर्मचारी दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंनी बाबा महाकालची दिव्य अलौकिक भस्म आरतीला देखील यावेळी हजेरी लावली. याशिवाय बाबा महाकाल यांची विधिवत पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. खासकरुन सहकारी क्रिकेटर ऋषभ पंतची (Rishabh Pant) प्रकृती लवकर ठीक होवो अशी प्रार्थनाही त्यांनी केली.


खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर ओम नमः शिवाय चा जप करताना दिसत आहेत. याशिवाय सूर्यकुमार यादव याने खासदार अनिल फिरोजिया यांच्याशी चर्चा केल्याचंही दिसून येत आहे. भारतीय क्रिकेटपटू पारंपरिक पोशाखात दिसत असू त्यांची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडल्याचं दिसत आहे. चाहते सतत सोशल मीडियावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ANI वृत्तसंस्थेने खेळाडूंचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून हे सर्व फोटो तुफान व्हायरल होत आहेत.






सूर्यकुमार यादवने ऋषभ पंतसाठी मागितला नवस...


सूर्यकुमार यादव याने यावेळी पत्रकारांशी संवाद साधला असताना यावेळी त्याने बाबा महाकाल यांच्या दिव्य अलौकिक भस्म आरतीमध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले. यादरम्यान मी बाबा महाकाल यांना सांगितले की माझा प्रिय मित्र आणि सहकारी क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा' अशी प्रार्थना मागितल्याचंही सूर्यकुमारनं सांगितलं. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवसाठी 2022 हे वर्ष कमालीचे यशस्वीचे ठरलं. त्याला ICC T20 टीम ऑफ द इयरमध्ये देखील आजचं स्थान मिळालं आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 3 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवपेक्षा फक्त रोहित शर्मानेच जास्त शतकं आता झळकावली आहेत.


हे देखील वाचा-