Kuldeep Yadav in India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा सामना 24 जानेवारीला होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar cricket Stadium) होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा विक्रम तो मोडू शकतो. कुलदीपला यासाठी केवळ 3 विकेट्सची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात (India vs New Zealand 3rd ODI) त्याने तीन विकेट घेतल्यास तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) विकेट घेण्याच्या बाबतीत शास्त्रींना मागे टाकेल. कुलदीप यादवने अलीकडेच जसप्रीत बुमराहला वन-डे क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत मागे टाकले होते.
टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव मागील काही दिवसांपासून कमालीच्या फॉर्मात दिसत आहे. त्याने संघात पुनरागमन करत भारताला काही सामने जिंकवून देण्यात महत्वाची कामगिरी बजावली. ज्यानंतर आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये रवी शास्त्रींच्या विकेट्सचा विक्रम मोडण्यासाठी त्याला तीन विकेट्सची गरज आहे. रवी शास्त्री यांनी 150 एकदिवसीय सामन्यात 136 डावात गोलंदाजी करताना 129 विकेट घेतल्या. शास्त्री आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत दोनदा चार आणि एकदा पाच बळी घेण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे, कुलदीप यादवने 77 एकदिवसीय सामन्यांच्या 75 डावांमध्ये गोलंदाजी करताना 127 बळी घेतले आहेत. कुलदीपने एकदिवसीय सामन्यात पाच वेळा चार विकेट आणि एकदा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. रवी शास्त्रींना मागे टाकण्यासाठी त्याला फक्त तीन विकेट्सची गरज आहे.
कुलदीप यादव फॉर्मात
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) सध्या उत्तम लयीत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संघात पुनरागमन झाल्यावर कुलदीप एकदिवसीय सामन्यांमध्ये नियमितपणे विकेट घेत आहे. गेल्या 10 सामन्यांच्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर प्रत्येक सामन्यात त्याने विकेट्स घेतल्या आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांत 3 बळी घेतले आहेत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांत तेवढ्याच विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने गेल्या 5 वनडेत 8 विकेट्स घेतल्या आहेत. यावरून तो आपल्या जुन्या फॉर्मात परतला असून तो शानदार गोलंदाजी करत असल्याचं दिसून येत आहे.
हे देखील वाचा-