Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना पावसामुळं रद्द झाल्यानं ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. महत्वाचं म्हणजे, भारतानं गेल्या तीन वर्षात मायदेशात एकही टी-20 मालिका गमावली नाही. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की एखाद्या संघानं मायेदशात सलग 9 मालिकेत पराभव स्वीकारला नाही. याआधी ऑस्ट्रेलियाच्या नावावर या विक्रमाची नोंद होती. ऑस्ट्रेलियाच्या संघानं मायदेशात सलग 8 मालिकेत पराभव स्वीकारला नाही.

दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडीज, श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इडीज, श्रीलंका आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारत दौरा केला आहे. ही यादी मागील तीन वर्षाची आहे. या कालावधीत भारतानं मायदेशात नऊ मालिका खेळल्या आहेत. यापैकी भारतानं एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघानं गेल्या आठ महिन्यात तिन्ही फॉरमेट मिळून सहा कर्णधार बदलले आहेत. या कर्णधाराच्या यादीत  शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांचा यात समावेश आहे.

भारताची मायदेशात मागील 9 मालिकेतील कामगिरी-

विरुद्ध संघ एकूण सामने निकाल अनिर्णित
दक्षिण आफ्रिका 3 1-1 1
बांगलादेश  3 2-1 0
वेस्ट इंडीज 3 2-1 0
श्रीलंका 3 2-0 1
इंग्लंड 5 3-2 0
न्यूझीलंड  3 3-0 0
वेस्ट इंडीज  3 3-0 0
श्रीलंका 3 3-0 0
दक्षिण आफ्रिका 5 2-2 1

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघ आयर्लंडशी भिडणार
दरम्यान, हार्दिक पांडयाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आयर्लंडशी दोन सामन्याची टी-20 मालिका खेळणार आहे. आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघानं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. ज्यामुळं आयर्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयनं हार्दिक पांड्याकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. आयपीएलमधील कामगिरीनंतर आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या हार्दिक पांड्याला रोहित शर्मानंतर भारतीय टी-20 संघाचा पुढचा कर्णधार म्हणून पाहिलं जातंय.

हे देखील वाचा-