International Cricket records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात रोहित शर्माने एका मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने आपल्या डावातील 22वी धाव पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 7वा फलंदाज ठरला आहे.


हा मोठा विक्रम करण्यासाठी रोहित शर्माने 438 सामन्यांत 457 डाव खेळले. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने 43 शतकं आणि 91 अर्धशतकंही केली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरीही 42 पेक्षा जास्त आहे. यादरम्यान रोहितने कसोटीत 3379 धावा, एकदिवसीय सामन्यात 9782 धावा आणि आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 3853 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 45.80 आहे. त्याचबरोबर त्याने वन-डेमध्ये 48.91 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजीची सरासरी 31.32 इतकी आहे.


या भारतीय फलंदाजांनी केल्या आहे 17000 हून अधिक धावा


1: भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 664 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 782 डावांमध्ये 34357 धावा केल्या आहेत.
2: विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याने 493 सामन्यांच्या 551 डावांमध्ये 25 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
3: राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने 24208 धावा केल्या आहेत.
4: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सौरव गांगुलीच्या नावावर 18575 धावा आहेत.
5: भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17266 धावा केल्या.
6: माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर 17253 आंतरराष्ट्रीय धावा आहेत.
7: सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17014 धावा केल्या आहेत.


कोहली-अश्विनही केला खास रेकॉर्ड


विराट कोहलीने (Virat KohlI) नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. तसंच अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती.


हे देखील वाचा-