PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 या यंदाच्या हंगामातील 27 वा सामना पेशावर झाल्मी आणि मुलतान सुलतान यांच्यात रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पेशावर झाल्मीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 242 धावा केल्या, ज्यात कर्णधार बाबर आझमने 73 तर सैम अयुबने 58 धावा केल्या. पेशावर संघाने त्यांच्या डावाच्या शेवटच्या षटकात एकूण 24 धावा केल्या. त्याचवेळी या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारला असता, स्टार अष्टपैलू कायरन पोलार्डने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर उत्कृष्ट झेल टिपला.


या सामन्यात पेशावर झल्मीच्या संघाला कर्णधार बाबर आझम आणि सैम अयुब या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भर घातली. त्यानंतप धावांचा वेग कमी करणं मुलतान सुलतानच्या गोलंदाजांसाठी सोपं काम नव्हतं. पेशावरसाठी मोहम्मद हॅरिस आणि टॉम कोल्हेर कॅडमोर यांनीही झटपट धावा केल्याने पेशावर झल्मीच्या संघाने 19 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या होत्या. मुलतान सुलतानसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या अन्वरकडून संघाला चांगली गोलंदाजी अपेक्षित होती, परंतु त्याने संपूर्ण षटकात एकट्याने 24 धावा देत धावसंख्या 242 धावांपर्यंत नेली.


अन्वर अलीने शेवटच्या षटकात 3 षटकार आणि 1 चौकार लगावला


स्लो ओव्हर रेटमुळे, मुलतान सुलतानला डावाच्या शेवटच्या षटकात 30 यार्डच्या आत 5 खेळाडू ठेवावे लागले. या षटकाबद्दल बोलायचं झालं तर, अन्वर अलीने पहिला चेंडू वाइड टाकला, तर पुढच्या चेंडूवर टॉम कोल्हेर कॅडमोरने षटकार ठोकला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार तर तिसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार लागला. आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर अन्वर अलीने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकवेळ सर्वांना वाटले की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण कायरन पोलार्डने शानदार क्षेत्ररक्षण करताना पहिला चेंडू सीमारेषेच्या आत टाकला. नंतर त्याचे कॅचमध्ये रूपांतर केले. यानंतर वहाब रियाझने पाचव्या षटकात षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. या सामन्यात अन्वर अलीने 4 षटकात 66 धावा देत 1 बळी घेतला.


पाहा कायरननं घेतलेला विकेट-






आयपीएलमध्ये पोलार्डकडे नवी जबाबदारी


निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्स संघासोबतच (Mumbai Indians) राहणार असून तो मुंबईच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलार्डने निवृत्ती घेताना शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे.  आपल्या स्टार खेळाडूला आता कोचिंग देताना पाहणं मुंबई संघासह चाहत्यांसाठी एक खास अनुभव असणार आहे.


हे देखील वाचा-