MS Dhoni Fan : भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी (MS Dhoni) याची फॅन फॉलोइंग जगभरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जागतिक क्रिकेटमध्ये तीन वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी आजही त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, त्याच्या एका चाहत्याने अशीच क्रेझ दाखवली असून थेट लग्नपत्रिकेवर धोनीचा फोटो त्याने छापला असून ही पत्रिका सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
पाहा फोटो-
कर्नाटकात राहणाऱ्या एका धोनीच्या फॅनने धोनीचा फोटो आपल्या लग्नाच्या कार्डवर छापला आहे. कार्डच्या उजव्या बाजूला धोनीचा फोटो छापण्यात आला होता, तिथं वधू-वरांची नावेही छापण्यात आली होती. या कार्डवर छापलेला धोनीचा फोटो 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे. महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या सीझनच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये टीमसोबत घाम गाळत आहे. आगामी आयपीएल सीझनबद्दल असे बोलले जात आहे की धोनीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सीझन असू शकतो आणि त्यानंतर तो या टी-20 लीगला अलविदा म्हणू शकतो.
चेन्नई सुपर किंग्ज अजूनही धोनीच्या उत्तराधिकारीच्या शोधात
महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, गेल्या मोसमात रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असली तरी संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारली होती. हंगामाच्या मध्यभागी पुन्हा संघाचं कर्णधारपद त्यानं घेतलं होतं. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आगामी आयपीएल हंगामातील पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. त्याचवेळी, या मोसमात जुन्या फॉर्मेटनुसार सामने खेळले जात असल्याने, CSK ला चेपॉकमध्ये बऱ्याच कालावधीनंतर सामना खेळण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये संघ 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळेल.
धोनी घेऊ शकतो आयपीएलमधूनही निवृत्ती
महेंद्र सिंग धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. आता असं मानलं जात आहे की 2023 मध्ये आयपीएलची 16 वी आवृत्ती त्याची शेवटची असेल, त्यानंतर तो आयपीएलमधूनही निवृत्त होईल. चेन्नईच्या चाहत्यांसमोर त्याला आयपीएलमधील शेवटचा सामना खेळायला आवडेल, असं धोनीने आपल्या आधीच्या वक्तव्यात स्पष्ट केलं होतं. अशा परिस्थितीत या मोसमानंतर तो क्रिकेटच्या या सर्वात मोठ्या लीगला अलविदा करेल अशी शक्यता आहे. मात्र धोनीकडून याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.
हे देखील वाचा-