India vs New Zealand, 1st T20 : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. दरम्यान आज पहिला टी20 सामान वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होत आहे. पण 12 वाजता सुरु होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे (Weather Update) वेळेत सुरु होऊ शकला नाही. ज्यामुळे भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेळ घालवण्यासाठी थेट एक वेगळाच खेळ खेळायला सुरुवात केली. मैदानातील एका इनडोअर जागी दोन्ही संघाचे खेळाडू फुटवॉली खेळ खेळताना दिसून आले.


चक्क खुर्च्यामध्ये ठेवून खेळाडूंनी सीमारेषा तयार केली आहे आणि दोन्ही संघाचे खेळाडू फुटवॉली खेळ खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये भारताचे संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि दीपक हुडा हे तिघे दिसत असून न्यूझीलंडचे बरेच खेळाडू दिसत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.


पाहा VIDEO- 









हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, वेलिंग्टनमध्ये (Wellington weather update)आज ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचीही मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जातेय. दुपारनंतर पाऊसासह वारा वाहण्याची शक्यता आहे. पाऊस आणि हवामानातील आर्द्रता यामुळं तापमानही 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतं. यामुळं भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील पहिला टी-20 (India vs New Zealand 1st T20) सामना रद्द होण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा-