India vs New Zealand, T20 Record : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होत आहे. भारत न्यूझीलंड दौऱ्यात तीन टी20 आणि तीन एकदिवसी.य सामने खेळणार आहे. दरम्यान आज पहिला टी20 सामान वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवलर होत आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...


आंतरराष्ट्री टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ यांच्यात आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, न्यूझीलंड संघाला 9 सामने जिंकता आले आहेत.  




कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?


भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता खेळवला जाणार आहे. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील. 


कसे आहेत दोन्ही संघ? 


भारतीय संघ :
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.


न्यूझीलंड संघ :
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी


अशी असू शकते भारताची अंतिम 11



सलामीवीर - शुभमन गिल, ईशान किशन


मिडिल ऑर्डर फलंदाज - दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन


ऑलराउंडर- हार्दिक पांड्या


गोलंदाज - युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.


हे देखील वाचा-