TATA IPL Auction 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनमध्ये (IPL Mega Auction 2022) भारतीय आणि विदेशी खेळाडूंसाठी कोट्यवधींची बोली लावण्यात आली. दरम्यान, अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. तर, अनेकांसाठी भलीमोठी बोली लावण्यात आली. आयपीएल मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेवर खरेदी करण्यासाठी कोणत्याही फ्रँचायझीनं उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी कोलकाताच्या संघानं त्याच्यावर बोली लावून त्याला संघात सामील केलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगमात अजिंक्य रहाणे कोलकाताकडून खेळणार आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. ज्यामध्ये भारताचा महान फलंदाज अजिंक्य रहाणेचेही नाव होतं. रहाणेला आयपीएलमध्ये अनेक सामने खेळण्याचा अनुभव आहे. दरम्यान, आयपीएल मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी कोलकात्यानं त्याला त्याची मूळ किंमत 1 कोटीत खरेदी केलंय. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून अजिंक्य रहाणे या लीगचा भाग आहे. तो राजस्थान व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्स आणि पुण्याकडूनही खेळला आहे. रहाणेनं आतापर्यंत 151 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 31.52 च्या सरासरीने 3941 धावा केल्या आहेत.
ट्वीट-
कोलकात्यानं खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी
कोलकाता नाईट रायडर्डनं आतापर्यंत श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅक्सन (60), अजिंक्य रहाणे (1 कोटी) आणि रिंकू सिंह (55 कोटी) यांना संघात सामील केलंय. आयपीएलचं मेगा ऑक्शन सुरु असून संघात आणखी खेळाडूंची भर पडण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-
- IPL Auction 2022 : लियाम लिव्हिंगस्टोन आयपीएलमध्ये विकला जाणारा इंग्लंडचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला, पंजाब किंग्जने लावली मोठी बोली
- IPL Auction 2022 : या खेळाडूंना मिळाली दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम, ईशान किशनवर सर्वाधिक बोली
- IPL Auction 2022 : आवेश खानची कोटीच्या कोटी उड्डाणं, IPL इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप खेळाडू, लखनौने मोजले 10 कोटी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha