IPL 2022 Mega Auction Players List, Who got whom : आयपीएलच्या 15 व्या हंगमासाठी सुरु असलेल्या लिलावाचा पहिला दिवस संपला आहे.  आज दिवसभरात दहा संघांनी 74 खेळाडूंवर 388 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावली. 74 खेळाडूंमध्ये 54 भारतीय आणि 20 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दिल्ली संघाने सर्वाधिक खेळाडूंना खरेदी केलं. तर पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने ईशानला 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर आवेश खान सर्वात महागडा अनकॅप खेळाडू राहिला. लखनौ संघाने आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केलं. लिलावाच्या पहिल्या दिवशी जवळपास दहा खेळाडूंना दहा कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. जाणून घेऊयात कोण आहेत हे कोट्यधीश खेळाडू.... 


1. ईशान किशनला  (Ishan Kishan) मुंबईने 15.25 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. पहिल्या दिवशी सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  .


2. वेगवान गोलंदाज दीपक चाहरला (Deepak Chahar)  चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटी रुपयांत परत घेतलं आहे.  


3. श्रेयस अय्यरला कोलकाता संघाने 12.25 कोटी रुपयांत खरेदी केलं.  


4. श्रीलंकाचा अष्टपैलू वानिंदु हसारंगाला (Wanindu Hasaranga) आरसीबीने 10.75 कोटी रुपयांत खरेदी केलं.  आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरला आहे.


5. वेस्ट विंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरनला (Nicholas Pooran) सनराइजर्स हैदराबादने 10.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.  


6. युवा हर्षल पटेलला आरसीबीने  10.75 कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. .


7. अष्टपैलू शार्दुल ठाकुरला 10.75 कोटी रुपयात दिल्लीने खरेदी केलं आहे.  


8. प्रसिध कृष्णाला राजस्थान रॉयल्सने दहा कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. 


9. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला दहा कोटी रुपयात गुजरातने खरेदी केलं आहे.  


10. आवेश खानला लखनौ संघाने 10 कोटी रुपयात खरेदी केलं आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा अनकॅप खेळाडू ठरला आहे.