IPL Mega Auction 2022 : IPL 2022 चा मेगा लिलाव बेंगळुरूमध्ये सुरू आहे. मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा फिरकी अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनसाठी जबरदस्त दंगल पाहायला मिळाली. एक कोटी मूळ किंमत असलेल्या या स्फोटक फलंदाजासाठी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची स्पर्धा होती.
मात्र, अखेरीस पंजाब किंग्जने या झंझावाती फलंदाजाला 11.50 कोटींना विकत घेतले. लियाम लिव्हिंगस्टोन यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. लिव्हिंगस्टोनपूर्वी, बेन स्टोक्स हा आयपीएलमध्ये विकला जाणारा सर्वात महागडा खेळाडू आहे.
अजिंक्य रहाणेला आधारभूत किमतीत विकले
सनरायझर्स हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज अॅडम मार्करामला 2.60 कोटी रुपयांना खरेदी केले. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला एक कोटी रुपयांना विकत घेतले. गुजरात टायटन्सने डॉमिनिक ड्रॅक्सला 1.10 कोटींना विकत घेतले. याशिवाय न्यूझीलंडचा अष्टपैलू जेम्स नीशमला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आरोन फिंच आणि भारतीय फलंदाज सौरभ तिवारी यांची विक्री अजून झाली नाही.
मनदीप सिंगला 1.10 कोटींना विकले
यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने मनदीप सिंगला 1.10 कोटींमध्ये खरेदी केले होते. दुसरीकडे, इंग्लिश स्फोटक फलंदाज डेव्हिड मलानला लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला गुजरात टायटन्सने 1.40 लाख रुपयांना विकत घेतले.
महत्वाच्या बातम्या :
- IPL Mega Auction Live Streaming Day 2: आयपीएल मेगा ऑक्शन 2022 लाईव्ह कधी, कुठे आणि कसं पाहायचं?
- IPL 2022 Auction Preity Zinta : आयपीएल लिलावात प्रीती झिंटा गैरहजर; 'हे' आहे कारण
- IPL 2022 Auction : 370 भारतीय आणि 220 परदेशी खेळाडू, पाहा संपूर्ण 590 खेळाडूंची यादी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha