T20 World Cup: टी-20 विश्वचषक 2022 सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक उरले आहेत. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेला येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या भूमीवर जेतेपद वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारतीय संघही विश्वचषकाच्या तयारीत गुंतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजांना काहीसा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. 2007 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषख खेळला गेला होता. तेव्हापासून तर 2021 पर्यंत या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांची नावं जाणून घेऊयात.
1) महिला जयवर्धने
श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटू टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महिला जयवर्धनं टॉपवर आहे. त्यानं टी-20 विश्वचषकात एकूण 31 सामन्यात श्रीलंकेच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय. ज्यात 39.07 च्या सरासरीनं 1 हजार 16 धावा केल्या आहेत. टी-20 विश्वचषकात 1 हजारहून अधिक धावा करणारा जयवर्धने एकमेव फलंदाज आहे.
2) ख्रिस गेल
या यादीत युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले आहेत. ज्यात 34.46 च्या सरासरीनं त्यानं 965 धावा केल्या आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत ख्रिस गेलनं आतापर्यंत शतकं झळकावली आहेत. महिला जयवर्धनेचा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त 51 धावांची गरज आहे.
3) तिलकरत्ने दिलशान
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशाननं टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 35 सामने खेळले आहेत. ज्यात 30.93 च्या सरासरीनं त्यानं 897 धावा केल्या आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्यानं नाबाद 96 धावांची खेळी केली होती.
4)रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 33 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 30 डावांमध्ये रोहित शर्मानं 38.50 च्या सरासरीनं 847 धावा केल्या आहेत.
5) विराट कोहली
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 19 डावांमध्ये कोहलीनं 76.81 च्या सरासरीनं 845 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 89 होती.
6) डेव्हिड वॉर्नर
या यादीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं आतापर्यंत टी-20 विश्वचषकातील 30 डावांमध्ये 27.21 च्या सरासरीनं 762 धावा केल्या आहेत.
7) एबी डिव्हिलियर्स
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचाही समावेश आहे. त्यानं टी-20 विश्वचषकातील 30 सामन्यांच्या 29 डावात 717 धावा केल्या आहेत.
8) शकिब अल हसन
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसननं टी-20 विश्वचषकात आतापर्यंत 31 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यानं 26.84 च्या सरासरीने एकूण 698 धावा केल्या आहेत.
9) कुमार संगकारा
श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारानं टी-20 विश्वचषकातील 31 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 25.42 च्या सरासरीनं 661 धावा केल्या आहेत.
10) शोएब मलिक
पाकिस्तानी फलंदाज शोएब मलिकने टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 31 डावांमध्ये त्याने 34.00 च्या सरासरीने 646 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-