Arshdeep Singh: इंदोरच्या (Indore) होळकर स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात आले. स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि सलामीवीर केएल राहुलला (KL Rahul) विश्रांती देण्यात आलीय. तर, संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) पाठिच्या दुखापतीमुळं संघाबाहेर झालाय, अशी माहिती कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) दिलीय.
नाणेफेक करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मानं भारतीय संघात तीन बदल करण्यात आल्याची माहिती दिलीय. स्टार फलंदाज विराट कोहली, केएल राहुलला विश्रांती देण्यात आलीय. तर, संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला किरकोळ दुखापत झाली असून चिंतेचं काही कारण नाही, असंही रोहित शर्मा म्हणाला. दुखापतीमुळं भारताच्या अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला टी-20 विश्वचषकाला मुकावं लागलं. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही पाठीच्या दुखापतीमुळं विश्वचषक संघातून बाहेर पडावं लागलंय. महत्वाचं म्हणजे, जसप्रीत बुमराहचीही दुखापत किरकोळ असल्याचं सांगितलं गेलं होतं. ज्यामुळं अर्शदीप सिंहबाबत भारतीय चाहत्यांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झालंय.
भारताची मालिकेवर विजयी आघाडी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळला जातोय. या मालिकेतील पहिला सामना तिरुवानंतपुरममध्ये खेळला गेला होता, जो भारतानं 8 धावांनी जिंकला. त्यानंतर गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला 16 धावांनी पराभवाची धुळ चारली. यासह भारतानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टी-20 मालिकेत पराभूत केलंय.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रिली रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
हे देखील वाचा-