T20 World Cup 2026 Team India Playing XI: आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) भारतीय क्रिकेट संघाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी शुभमन गिलला वगळले आहे, तर अनेक महिन्यांपासून संघाबाहेर राहिलेला इशान किशन पुन्हा टीम इंडियात परतला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आलेला रिंकू सिंगचाही टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी, असेल जाणून घ्या...
अभिषेकसोबत संजू, रिंकूही प्लेइंग इलेव्हनमध्ये- (T20 World Cup 2026 Team India Playing XI)
शुभमन गिलला टी-20 विश्वचषकातून वगळण्यात आल्यामुळे अंतिम इलेव्हनमध्ये काही बदल होतील. गेल्या काही वर्षांपासून टी-20 मध्ये डावाची सुरुवात करणारे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे देखील विश्वचषकात दिसतील. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. आक्रमक फलंदाजीसाठी रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल. उपकर्णधार अक्षर पटेल, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या या तीन अष्टपैलू खेळाडूंचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असेल. तसेच जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगसह शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजी सांभाळतील. तसेच अक्षर पटेलसोबत वरुण चक्रवर्ती फिरकी गोलंदाजी सांभाळेल.
टी-20 वर्ल्डकपसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI- (T20 World Cup 2026 Playing XI)
- अभिषेक शर्मा,
- संजू सॅमसन (विकेटकीपर),
- तिलक वर्मा,
- सूर्यकुमार यादव (कर्णधार),
- शिवम दुबे,
- हार्दिक पांड्या,
- अक्षर पटेल,
- रिंकू सिंह,
- वरुण चक्रवर्ती,
- अर्शदीप सिंग,
- जसप्रीत बुमराह.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संपूर्ण संघ: (Team India Squad T20 World Cup 2026)
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा.
2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक (Team India’s Schedule for the T20 World Cup 2026)
7 फेब्रुवारी - विरुद्ध अमेरिका12 फेब्रुवारी - विरुद्ध नामिबिया15 फेब्रुवारी - विरुद्ध पाकिस्तान18 फेब्रुवारी - विरुद्ध नेदरलँड्स