T20 World Cup 2024: भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) मध्ये सुपर-8 चा पहिला सामना काल (20 जून) अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजच्या जागी आलेल्या कुलदीप यादवच्या रूपाने भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. सुपर-8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जातील, जिथे फिरकीपटूंना मदत मिळेल. त्यामुळे आता टीम इंडिया सर्व सामन्यांमध्ये फक्त तीनच फिरकीपटूंसोबत खेळणार का? कर्णधार रोहित शर्माने याबाबत खुलासा केला आहे.


सामन्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?


तीन वेगवान गोलंदाजांना खेळवण्यासाठी आपण नेहमीच तयार असतो, असे रोहित शर्माने स्पष्ट केले. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात तीन फिरकीपटूंना खेळवल्यास बरे होईल, असे वाटल्याने आम्ही हा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांत आम्ही येथे आलो आणि काही टी-20 क्रिकेट खेळलो. आम्ही थोडे चांगले नियोजन केले. परिस्थिती कशीही असली तरी आम्ही त्यांना चांगले जुळवून घेतले. आम्हाला आमच्या गोलंदाजीची श्रेणी माहित आहे. सूर्या आणि हार्दिकची शेवटला चांगली भागिदारी झाली, असंही रोहित शर्मा म्हणाला. 


बुमराह काय करु शकतो, हे आम्हाला माहिती आहे-


रोहित शर्मा पुढे म्हणाला की, बुमराह आमच्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला माहीत आहे. त्याचा चांगला वापर करणे महत्त्वाचे आहे. तो एक असा खेळाडू आहे जो जबाबदारी घेण्यास तयार असतो. तो जिथेही खेळतो, तो नेहमीच जबाबदारी घेतो. मला परिस्थितीचे आकलन करावे लागेल. विरोधी संघ पाहता, आम्ही कोणतेही बदल करण्यास तयार आहोत. आम्हाला वाटले की तीन फिरकीपटू चांगले असतील, म्हणून आम्ही त्यासाठी गेलो. जर गरज पडली तर आम्ही करू शकतो, असं रोहित शर्माने सांगितले.






भारताकडून सूर्यकुमार यादवचे अर्धशतक-


भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 53 धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 8, विराट कोहली 24 आणि ऋषभ पंत 20 धावा करत बाद झाला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानसमोर भारताचे सलामीवीर गडगडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला. सूर्यकुमारने 28 चेंडूत 53 धावा केल्या. तर हार्दिक पांड्या 24 चेंडूत 32 धावा करत बाद झाला. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने 3, फजलहक फारुकी 3 आणि नवीन उल हकने 1 विकेट घेतली.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: सूर्यकुमार यादवने विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागे; केवळ 64 सामन्यात केला भीमपराक्रम


T20 World Cup 2024 IND vs AFG: बुमराहने अफगाणिस्तानची हवा काढली, सूर्यकुमारने अर्धशतक ठोकले; भारताचा सुपर 8 मधील पहिला विजय


T20 World Cup 2024 IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध भारताचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले; BCCI ने सांगितलं भावनिक कारण