T20 World Cup 2024 USA vs IND न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आतापर्यंत 11 मॅचेस झाल्या आहेत. अमेरिकेनं (USA) कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत करत चार गुणांची कमाई केली आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. अमेरिकेसह अ गटात भारत, पाकिस्तान, कॅनडा आणि आयरलँड आहे. आयरलँडविरुद्ध मॅच जिंकल्यानंर भारतीय संघाची लढत पाकिस्तान विरुद्ध 9 जूनला होणार आहे. याशिवाय भारत आणि अमेरिका 12 जूनला नासाऊ काऊंटी स्टेडियमवर न्यूयॉर्कमध्ये आमने सामने येणार आहेत.
अमेरिकेनं सलग दोन मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर इतर संघांना त्यांच्यापासून सतर्क राहण्याची गरज आहे. अमेरिकेनं पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं आहे. भारताची टी20 वर्ल्ड कपमधी तिसरी लढत अमेरिकेविरुद्ध होणार आहे.
अमेरिकेच्या विजयामुळं भारताला सतर्क राहण्याची गरज
टी 20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं आतापर्यंत ज्या दोन मॅच जिंकल्या आहेत. त्या दमदार कामगिरी करत जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या संघात भारतीय, वेस्ट इंडिज, दक्षिणआफ्रिका, न्यूझीलँड आणि पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. हे खेळाडू कोणत्याही संघापुढं तगडं आव्हान निर्माण करु शकतात. अमेरिकेनं नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशला पराभूत केलं होतं. कॅनडा आणि पाकिस्तानला टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं पराभूत केलं आहे. त्यामुळं भारतीय संघापुढे ते तगडं आव्हान निर्माण करु शकतात. भारतीय संघाला यामुळं अमेरिकेविरुद्ध सतर्क राहण्याची गरज आहे.
अमेरिकेचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये
टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिका आणि भारत 12 जूनला आमने सामने येणार आहेत. अमेरिकेनं आतापर्यंत दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. कॅनडा विरुद्धच्या मॅचमध्ये एरॉन जोन्स तर पाकिस्तान विरुद्ध मोनांक पटेल यानं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला आहे.
एरॉन जोन्सनं 2 मॅचमध्ये 130 धावा केल्या आहेत. एंड्रिस गूस ने 2 मॅचमध्ये 100 धावा केल्या आहेत. तर, मोनांक पटेल यानं 54 बॉलमध्ये 66 धावा केल्या आहेत. अमेरिकेचा बॉलर नास्तुष केन्जीगे यानं एका मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या आहेत. सौरभ नेत्रावळकर आणि अली खान यानं दोन दोन विकेट घेतल्या आहेत.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन
इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग
अमेरिका: वन टेलर, मोनांक पटेल (विकेटकीपर आणि कॅप्टन ), एंड्रिस गौस, आरोन जोन्स, नीतीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शैडले वैन स्काल्कविक, जसदीप सिंह, अली खान, सौरभ नेत्रावळकर
संबंधित बातम्या :
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर