T20 World Cup 2024 Team India Semi Final: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं आहे. सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 50 धावांनी दणदणीत पराभव केला. भारताच्या 197 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना बांगलादेशला भारताने 8 बाद 146 असं रोखलं. कुलदीप यादवने तीन तर अर्शदीप आणि बुमराने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 






सुपर-8 मध्ये पोहोचलेल्या सर्व आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गट-1 मधील अव्वल संघाचा सामना दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होईल. दुसऱ्या गटातील अव्वल संघाचा सामना पहिल्या गटात दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघाशी होईल. मात्र, भारतीय संघ दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना खेळणार असल्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. 


दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नाही- 


2024 टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना 27 जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता खेळवला जाईल. म्हणजेच वेस्ट इंडिजमधील सामना 26 जूनच्या रात्री सुरू होईल. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. आयसीसीने भारताच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही (जर टीम इंडिया उपांत्य फेरीत गेली तर) या सामन्यात पाऊस पडला तर सामना सुरू होण्यासाठी सुमारे 4 तासांचा कालावधी देण्यात आला आहे.  तरीदेखील सामन होऊ  शकला नाही, तर सुपर-8 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. 


भारतासाठी सर्व सामने जिंकणे महत्त्वाचे-


27 जून रोजी गयानामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या (24 जून) ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणं देखील भारतीय संघासाठी महत्वाचं असणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, 24 जून रोजी झालेल्या सुपर-8 सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला आणि त्यानंतर उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असल्यास पराभूत होईल. दुसरीकडे, सुपर-8 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास उपांत्य फेरी रद्द झाल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 IND vs BAN: 'हार्दिक हा हार्दिक आहे, तो संघासाठी महत्वाचा खेळाडू'; सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?


T20 World Cup 2024: जसप्रीत बुमराह ते शेन वॉटसनपर्यंत...; 4 दिग्गज क्रिकेटपटूंनी स्पोर्ट्स प्रेझेंटरसोबत केलं लग्न


T20 World Cup 2024 IND vs BAN: वेस्ट इंडिजमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला; बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत विक्रम नोंदवला!