नवी दिल्ली: रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया (Team India ) सुपर 8 मध्ये पोहोचली आहे. सुपर 8 मध्ये भारताचे सामने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुद्ध होतील. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये सर्व मॅच जिंकल्या आहेत. भारताची कॅनडा विरुद्धची मॅच पावसानं रद्द झाली होती. ग्रुप स्टेजमध्ये शिवम दुबेनं (Shivam Dube) अमेरिकेविरुद्ध (USA) चांगली कामगिरी केली होती. मात्र,टीम इंडियाच्या 2007 च्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या एस. श्रीशांतनं मोठं वक्तव्य केलं आहे. एस. श्रीशांतनं सुपर 8 मध्ये भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन कोणती असेल याबाबत भाष्य केलं आहे. शिवम दुबे ऐवजी संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी द्यावी, असं एस. श्रीशांत म्हणाला आहे.  


संजू सॅमसनला संधी द्यावी 


भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीशांतनं संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळालयला हवी असं म्हटलं. संजूला संधी देताना रिषभ पंतला बाहेर काढू नका. तो पण संघात असावा जर सध्या शिवम दुबे गोलंदाजी करत नसेल. तो फक्त फलंदाज म्हणून खेळत असेल तर शिव  दुबे भारतासाठी चांगला पर्याय नाही. त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी मिळावी, असं श्रीशांत म्हणाला. शिवम दुबेच्या ऐवजी संजू सॅमसनला संधी दिल्यास वेगळं समीकरण निर्माण होईल, असं श्रीशांत म्हणाला. 


भारत सुपर 8 मध्ये कुणाविरुद्ध लढणार?


 भारतासह अ गटातून अमेरिकेनं देखील सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारताचा सुपर 8 मधील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 20 जूनला होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच रात्री  8 वाजता सुरु होईल. भारताचा सुपर 8 मधील दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध  होईल.ही मॅच 22 जूनला होणार आहे.  भारताचा सुपर 8 मधील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच 24 जूनला होणार आहे. 


 
भारत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार


भारताला आयसीसीच्या स्पर्धेत गेल्या दहा वर्षांमध्ये यश मिळालेलं नाही. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात विजेतेपद मिळवलं होतं. मात्र तेव्हापासून भारताला कसोटी, वन डे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावता आलेलं नाही. गेल्या वर्षी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतानं अंतिम फेरीत धडक दिली होती.मात्र, भारताला ऑस्ट्रेलियानं पराभूत करत विजय मिळवला.


संबंधित बातम्या :



T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक