T20 World Cup 2024 किंग्जटाऊन : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) आज 27 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध नेदरलँड (BAN vs NED) आमने सामने आले. बांगलादेशनं शाकिब अल हसन आणि तंजिद हसनच्या फलंदाजीच्या जोरावर 5 विकेटवर 159 धावा केल्या. बांगलादेशनं नेदरलँड पुढं विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशचा प्रमुख फलंदाज शाकिब अल हसन यानं नाबाद 64 धावा केल्या. अखेरच्या तीन ओव्हरमध्ये बांगलादेशच्या फलंदाजांनी चागंली फटकेबाजी करत 159 धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँडचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 134 धावा करु शकला. बांगलादेशनं 25 धावांनी ही मॅच जिंकली.
नेदरलँडला विजयासाठी 160 धावांचं आव्हान
बांगलादेशची नेदरलँड विरुद्ध खराब सुरुवात झाली होती. कॅप्टन नसमूल होसैन शांटोनं केवळ 1 रन करुन बाद झाला. लिटन दास देखील 1 रन करुन बाद झाला. यानंतर तंजिद हसन आणि शाकिब उल हसन या दोघांनी चांगली भागिदारी करत बांगलादेशचा डाव सावरला. तंजिद हसननं 35 धावा केल्या. तर, शाकिब अल हसन नाबाद 64 धावांची खेळी केली. तर, महम्मदुल्लाहनं 25 धावा केल्या. जाकेर अलीन 14 धावा केल्या. या सर्वांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशनं 5 विकेटवर 159 धावा केल्या.
नेदरलँडचा कॅप्टन स्कॉट एडवर्डनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशनं नेदरलँडला विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेदरलँडनं चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यांना ती लय कायम ठेवता आली नाही. एम. लेविटनं 18 धावा केल्या. एमपी ओ दोऊदनं 12 धावा केल्या. विक्रमजित सिंगनं आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यानं 3 षटकार मारत 26 धावा केल्या. एंगलब्रेख्तनं 33 धावांची खेळी करत बांगलादेशला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. नेदरलँडचा कॅप्टन एसए एडवर्डसनं 25 धावांची खेळी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर 20 ओव्हरमध्ये नेदरलँडचा संघ 8 विकेटवर134 धावा करु शकला. आजच्या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी नेदरलँडची सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याची शक्यता अजूनही कायम आहे.
गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये शर्यत आहे. श्रीलंकेचा संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर गेलेला आहे. बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यातील कोणता संघ सुपर 8 जाईल याचा निर्णय होताना नेट रनरेट देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या :