T20 World Cup 2024 Jos Buttler: टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) सुपर-8 मधील स्पर्धा अधिक रोमांचक होत आहे. एकुण 8 संघांमधून आतापर्यंत एकच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाला आहे, तो म्हणजे ग्रुप-2 मधील  इंग्लंड. भारत, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका या संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस रंगली आहे. 


टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी 18.4 षटकांत विजय मिळवणे आवश्यक असलेल्या इंग्लंडला अमेरिकेविरुद्ध 9.4 षटकांमध्येच बाजी मारली. अमेरिकेला 115 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने बिनबाद 117 धावा केल्या. यामध्ये कर्णधार जॉस बटलरने 38 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 7 षटकार टोलावले. जॉस बटलरने हरमीत सिंहच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकले. हरमीतच्या त्या षटकात एकूण 32 धावा केल्या.






ख्रिस जॉर्डनची हॅट्ट्रिक


टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने या विश्वचषकात दोनदा हॅट्ट्रिक घेतली होती. ख्रिस जॉर्डनने आज हॅट्ट्रिक घेतली. त्याने आधी  अली खान, नंतर केंझिगे आणि शेवटी सौरभ नेत्रावलकर याला तंबूत पाठवत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने कोरी अँडरसनची विकेटही घेतली. जॉर्डनने 2.5 षटकात केवळ 10 धावा देत 4 बळी घेतले.


इंग्लंडचा उपांत्य फेरीत प्रवेश 


अमेरिकाचा पराभव करत इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला.  टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड पहिला संघ बनला. सुपर 8 मध्ये ब गटात इंग्लंडचा संघ अव्वल आहे, त्यांनी तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यापैकी एक संघ आता ब गटातून उपांत्य फेरती पोहचणार आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज होणारा सामना निर्णायक असेल. यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळू शकते. 






संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: अफगाणिस्तानने लोळवलं, पण घमंड उतरला नाही; ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने थेट टीम इंडियाला डिवचलं!


T20 World Cup 2024: ...अन् अफगाणिस्तान थेट विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहचेल; नेमकं समीकरण काय?, समजून घ्या!


T20 World Cup 2024 Team India: वेस्ट इंडिजचा संघ जर विश्वचषकात...; सर विवियन रिचर्ड्स आले, हसवले, मनातले सगळं बोलले, Video