IND vs AUS, T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकात सुपर 8 साखळीत भारताचा अखेरचा साखळी सामना आज ऑस्ट्रेलियाशी (India vs Australia) होत आहे. विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) उपांत्य फेरीचं तिकीट मिळवायचं, तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. कारण अफगाणिस्ताननं रविवारी सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केलेला धक्कादायक पराभव. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलेय. या सामन्याबाबत क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी खास रिपोर्ट पाठवलाय, तोही सेंट लुसिया येथून.. पाहूयात ते काय म्हणतात....


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला नेहमीच एक जबरदस्त डिमांड असते. रसिक प्रेक्षक क्रिकेट मैदानाकडे अक्षरशः धाव घेऊन जातात. यावर्षीच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सोमवारी होतोय. बारबाडोस येथे झालेल्या भारताच्या सामन्याला मैदान रसिकांनी पूर्ण भरलेलं नव्हतं. पण आता सेंट लुसिया येथील परिस्थिती वेगळी आहे. कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची तिकीट सगळी विकली गेलेली आहे. इतकाच नाही तर या सामन्याला असलेली उत्सुकतेची धार हे अजून थोडीशी तेज झालेली आहे. त्याला कारण जगातल्या नंबर एक आणि दोन मधला हा सामना आहेच पण अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलियाला हरवल्यामुळे भारत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान बांगलादेश या गटामध्ये एकदम चुरस निर्माण झालेली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं तर गटामध्ये काय होऊ शकतो सगळ्यांना माहिती आहे. खास करून जर अफगाणिस्ताने बांगलादेशला हरवलं तर पण ही गोष्ट दिसते तेवढी सोपी नक्कीच नाहीये. 


ऑस्ट्रेलिया संघ निर्णायक क्षणी किती चांगला खेळ करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातनं हे कोपऱ्यात सापडलेले, ढकलला गेलेला कांगारू आहे. त्यामुळे ते शेपटी मागे टेकवेल आणि एकदम जोरात उडी घेईल, असा माझा अंदाज आहे.  भारतीय संघाला विजयाचा मार्ग शोधायचा असला तर गेल्या सामन्यांमध्ये जसा आक्रमकतेचा वेगळा विचार केला,  सुरुवातीपासून धावा मोठ्या धावा जमा करायचा विचार केला. त्याच्याकरता मोठे फटके मारले, तरच मोठा स्कोर उभारता येणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधात सेंट लुसिया मैदानातही भारतीय संघाला आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 


 ऑस्ट्रेलियन संघाला तुम्ही फक्त अप्रतिम क्रिकेट खेळूनच धाक दाखवू शकता. कारण या संघांमध्ये नऊ खेळाडू असेल जे बॅटिंग-बॉलिंग इक्वली करू शकतात. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम  हे चांगल्या क्रिकेट करता प्रसिद्ध आहे. कारण इथल्या विकेटला बाऊन्स आहे. त्यामुळे फलंदाजी चांगली होणार आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहणार आहे.   भारतीय संघ आत्ताच चांगल्या लयीत क्रिकेट खेळतोय. बॅटिंग आणि बॉलिंगचा समतोल ऑलमोस्ट साधला गेलेला आहे. त्यामुळे मी तर म्हणेन ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकला तर योग्य गोष्ट घडू शकते. उपांत्य फेरी गाठली जाऊ शकते आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा पत्ताही कट होऊ शकतो.