T20 World Cup 2024 Aus vs AFG Marathi News: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024 Marathi News)आज मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली. अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.


प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने 4 विकेट्स, नवीन-उल-हकने 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन संघाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आज अफगाणिस्तानने या बलाढ्य संघाचा पराभव केल्याने सर्वत्र कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. ऑस्ट्रेलियाने आज सामना जिंकला असता, तर उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं असतं. आता ऑस्ट्रेलियाला उद्या होणारा भारताविरूद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे. 


अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर अन् टीम इंडियच्या सामन्याआधी मिचेल मार्श काय म्हणाला?


आज आमचा दिवस अजिबात नव्हता. खेळपट्टी दोन्ही संघांसाठी चांगली नव्हती. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. आजच्या सामन्यातील विजयाचे संपूर्ण श्रेय अफगाणिस्तान संघाला जाते. या पराभवातून लवकरच बाहेर पडायला आम्हाला आवडेल, असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श म्हणाला. तसेच भारतासोबतच्या सामन्याबद्दल तो म्हणाला, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं म्हणत मिचेल मार्शने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला.


ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले


अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ती ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. स्टॉइनिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅथ्यू वेड 5 धावा करून बाद झाला.


अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी -


अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियालाची चांगलीच कोंडी केली. गुलाबदिन नायबने 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत . मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतली. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024: ...अन् अफगाणिस्तान थेट विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहचेल; नेमकं समीकरण काय?, समजून घ्या!


T20 World Cup 2024 Aus vs AFG: टी20 विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवलं; भारतातील बदला वेस्ट इंडिजमध्ये घेतला!


T20 World Cup 2024 Aus vs AFG: हाच तो क्षण! हसले, रडले, मैदान गाजवले; अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच काय घडले?, Video