न्यूयॉर्क : भारत आणि आयरलँड यांच्यातील टी20 वर्ल्ड कपमधील लढतीला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयरलँड विरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन अपयशी ठरले. रिषभ पंतनं भीषण कार अपघातानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. रोहित शर्मा  आणि विराट कोहली ही भारताची अनुभवी फलंदाजांची जोडी डावाची ओपनिंग करणार आहे.



रोहित शर्मानं आयरलँड विरुद्ध भारतीय संघात दोन स्पिनर्स सह खेळण्याचा निर्णय घेतला. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी दिली. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला आजच्या मॅचमध्ये संधी देण्यात आली नाही. 



भारतानं टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मानं आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करणार असल्याचं म्हटलं. आमची तयारी चांगल्या प्रकारे झाली असून इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला. आम्हाला जसा खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय आहे त्यापेक्षा पीच वेगळ आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. आजच्या मॅचमध्ये कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, युजवेंद्र चहल आणि संजू सॅमसन खेळणार नाहीत, असं रोहित शर्मानं म्हटलं. 


आयरलँडचा कॅप्टन पॉल स्टर्लिंगनं म्हटल की, आम्ही टॉस जिंकला असता तर पहिल्यांदा बॉलिंग केली असती. आम्ही चांगली तयारी करुन इथं पोहोचलो आहे. आम्ही नुकतीच नेदरलँडसमध्ये मॅच खेळली आहे. आमच्याकडे अनेक मॅच विनर प्लेअर्स आहेत. आम्ही इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पॉल स्टर्लिंगनं म्हटलं. 



भारताची आक्रमक गोलंदाजी


भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजनं दमदार गोलंदाजी केली. अर्शदीप सिंगनं एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत आयरलँडला सुरुवातीलाच धक्के दिले. 


संभाव्य प्लेईंग इलेव्हन 


भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), विराट कोहली,  सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


आयरलँड: लोरकन टकर (विकेटकीपर), एंडी बालबर्नी, हॅरी टेक्टर, मरेयर एडायर, पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), गेरेथ डेलाने, जॉर्ज डॉकरेल, कर्टिस कैम्फर, बैरी मैक्कार्थी, जोशुआ लिटिल, क्रेग यंग. बेंजामिन वाईट,


संबंधित बातम्या : 


T20 World Cup 2024:आयरलँडच्या कोचचं भलतं धाडस, रोहित शर्माच्या टीमला चॅलेंज, आम्ही भल्या भल्यांना....