T20 World Cup 2024, IND vs IRE न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारत आणि आयरलँड आमने सामने येणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता दोन्ही संघ आमने सामने येतील. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही संघाची आज ही पहिली मॅच आहे. भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपची सुरुवात विजयानं करण्याच्या प्रयत्ना असेल. दुसरीकडे आयरलँडचे प्रशिक्षक हेनरिक मलान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाला आयरलँडच्या प्रशिक्षकांनी मोठं आव्हान दिलं आहे. आमच्या संघात मोठे उलटफेर करण्याची क्षमता आहे, असं देखील हेनरिक मलान यांनी म्हटलं.
हेनरिक मलान भारताविरुद्धची रणनीती सांगितली रणनीती
आयरलँडचे कोच हेनरिक मलान यांनी म्हटलं की,"टी20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी आम्हाला चांगली संधी मिळाली आहे. आम्हाला ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, त्याची सुधारणा करणार आहोत. भारत एक अनुभवी टीम आहे, ज्यांच्या विरोधात मोठी रणनीती तयार करण्याची आणि माहिती मिळवण्याची गरज असल्याचं मलान म्हणाले. आम्ही भारताच्या कमजोर बाबी शोधून काढू ज्याचा आम्हाला फायदा होईल, असं मलान म्हणाले.
मलान यांनी पुढं म्हटलं की, टी20 वर्ल्ड कपमध्ये सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही फक्त वर्ल्ड कप, भारताविराधात किंवा इतर मोठ्या संघाविरुद्ध चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत नाही तर चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी एक यंत्रणा आणि रचना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळं आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकू, असं हेनरिक मलान यांनी म्हटलं. आम्ही त्यानुसार कामगिरी करु, अशी आशा असल्याचं मलान यांनी म्हटलं आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो, मोठ्या संघांना पराभूत करु शकतो, आमच्या खेळाचा तो एक भाग बनेल, असं मलान म्हणाले.
आयरलँडनं यापूर्वी दिलेत मोठे धक्के
आयरलँडकडे मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे. अलीकडच्या काळात आयरलँडनं अफगाणिस्ताना, बांगलादेश आणि पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या मालिकेत विजय मिळवला होता. मात्र, त्यांना मालिकेत विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. भारत आणि आयरलँड टी20 मॅचमध्ये यापूर्वी 8 वेळा आमने सामने आले होते. भारताला त्यापैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळाला होता. तर, एक मॅच रद्द झाली होती.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
आयरलँड: लोरकन टकर (विकेटकीपर), एंडी बालबर्नी, हॅरी टेक्टर, मरेयर एडायर, पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), गेरेथ डेलाने, जॉर्ज डॉकरेल, कर्टिस कैम्फर, बैरी व्हाइट, जोशुआ लिटिल, क्रेग यंग.
संबंधित बातम्या :
SL vs SA: दक्षिण आफ्रिकेचा धमाका,पहिल्याच मॅचमध्ये श्रीलंकेला दणका, सहा विकेटनं दणदणीत विजय