न्यूयॉर्क :  टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि आयरलँड (IND vs IRE) यांच्यात मॅच पार पडली. या मॅचवर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृतत्वातील टीम इंडियाचं वर्चस्व राहिलं. रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांच्या दमदार गोलंदाजीमुळं आयरलँडचा संघ शंभर धावांचा टप्पा देखील ओलांडू शकला नाही. आयरलँडचा संघ 96 धावांवर बाद झाला.  भारताला विजयासाठी 97 धावांचं आव्हान होतं. भारतानं हे आव्हान सहजपणे पार केलं. रोहित शर्मानं अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाजवळ पोहोचवलं.


रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. अमेरिकेत उशिरानं दाखल झालेल्या विराट कोहलीला आज चांगली कामगिरी करता आली नाही. विराट कोहली केवळ 1 रन करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि रिषभ पंतनं संयमी खेळी करत संघाला विजयाजवळ पोहोचवलं. रोहित शर्मानं चार चौकार आणि तीन षटकार मारत संघाला विजयाजवळ पोहोचवलं. मात्र, आयरलँडच्या गोलंदाजाचा बॉल खांद्यावर लागल्यानं रोहित शर्मानं रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला.  रोहित शर्मानं 52 धावा केल्या.  यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला. 


रिषभ पंतला देखील आज टीम इंडियाची जर्सी तब्बल 500 हून अधिक दिवसानंतर घालून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रिषभ पंतनं देखील संयमी खेळी करत भारताच्या विजयाचा मार्ग सोपा केला. सूर्यकुमार यादवनं केवळ 2 धावा केल्या. शिवम दुबे मैदानावर उतरला मात्र खातं उघडता आलं नाही. रिषभ पंतनं 2 षटकार आणि 3 चौकारांसह 36 धावा करत भारताला पहिला विजय मिळवून दिला. 


आयरलँडचा संघ 96 धावांवर बाद  


रोहित शर्मानं पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अर्शदीप सिंगनं डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आयरलँडला दोन धक्के दिले. अर्शदीप सिंगनं जे आयरलँडला धक्के दिले त्याप्रमाणं मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलनं आयरलँडला धक्के दिले. हार्दिक पांड्यानं आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी विसरुन दमदार कामगिरी केली. त्यानं चार ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी दान विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं एक विकेट घेतली. यामुळं आयरलँडचा संघ 96 धावांवर बाद झाला. आयरलँडकडून डेलाने यानं सर्वाधिक 25 धावा केल्या. 


दरम्यान, भारताची दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध 9 जूनला होणार आहे. 


संबंधित बातम्या :


Team India : रिषभ पंतचं कमबॅक, रोहित विराट ओपनिंग करणार, आयरलँड विरुद्ध भारताची विशेष रणनीती, रोहित शर्मानं प्लॅन सांगितला


T20 World Cup 2024:आयरलँडच्या कोचचं भलतं धाडस, रोहित शर्माच्या टीमला चॅलेंज, आम्ही भल्या भल्यांना....