न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत (Team India) आणि आयरलँड (Ireland) आमने सामने आले आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आयरलँडला नियमितपणे धक्के दिले. आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी आणि वैयक्तिक आयुष्यात पत्नी नताशा स्टॅनकोविक हिच्या सोबतच्या कथित घटस्फोटाच्या चर्चेनंतर हार्दिक पांड्यानं दमदार कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्यानं सराव सामन्याप्रमाणं आज देखील दमदार कामगिरी केली. अर्शदीप सिंगनं आयरलँडला सुरुवातीला एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. तर, हार्दिक पांड्यानं तीन विकेट घेत आयरलँडला बॅकफूटवर ढकललं. आयरलँडला भारतीय संघानं 96 धावांमध्ये रोखलं. भारताला विजयासाठी 97 धावांची गरज आहे. डेलाने वगळता आयरलँडचे इतर फलंदाज दमदार कामगिरी करु शकले नाहीत. 



रोहितचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला


रोहित शर्मानं आयरलँड विरुद्ध टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी सार्थ ठरवला. अर्शदीप सिंगनं आयरलँडला तिसऱ्या ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. जसप्रीत बुमराहनं देखील दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजनं एक विकेट घेतली. अक्षर पटेल यानं देखील एक विकेट घेतली.


हार्दिक पांड्याची दमदार कामगिरी


हार्दिक पांड्याला आयरलँडचा कॅम्फरनं नवव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर सिक्स मारला होता. या सिक्सचा बदला हार्दिक पांड्यानं अखेरच्या बॉलवर आऊट करत घेतला. हार्दिकनं 4 ओव्हरमध्ये 27 धावा देत तीन विकेट घेतल्या. यामध्ये कॅम्फर,एमआर  अडायर आणि एलचे टकरला बाद केलं. 


डेलानेनं आयरलँडचा डाव सावरला


एका बाजून आयरलँडच्या विकेटची मालिका सुरु असताना एकमेव फलंदाज ग्राऊंडवर टिकून होता. डेलाने यानं दोन चौकार आणि दोन षटकार मारत 25 धावा केल्या. यामुळं आयरलँडचा संघ 96 धावांपर्यंत पोहोचला. 
 
 
 भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), विराट कोहली,  सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


आयरलँड: लोरकन टकर (विकेटकीपर), एंडी बालबर्नी, हॅरी टेक्टर, मरेयर एडायर, पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), गेरेथ डेलाने, जॉर्ज डॉकरेल, कर्टिस कैम्फर, बैरी मैक्कार्थी, जोशुआ लिटिल, क्रेग यंग. बेंजामिन वाईट,


संबंधित बातम्या : 


Team India : रिषभ पंतचं कमबॅक, रोहित विराट ओपनिंग करणार, आयरलँड विरुद्ध भारताची विशेष रणनीती, रोहित शर्मानं प्लॅन सांगितला


T20 World Cup 2024:आयरलँडच्या कोचचं भलतं धाडस, रोहित शर्माच्या टीमला चॅलेंज, आम्ही भल्या भल्यांना....