T20 World Cup 2024 Ind vs ENG:  टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली होत आहे. भारतीय संघ 27 जून रोजी गयाना येथील गयाना नॅशनल स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध दुसरा उपांत्य सामना खेळणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या 11व्या सुपर-8 सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने अर्शदीप सिंगवर बॉल टॅम्परिंग केल्याचा गंभीर आरोप केले होता. त्यानंतर उपांत्य फेरीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अर्शदीप सिंगचे समर्थन करत इंझमाम उल हकला चोख प्रत्युत्तर दिले.


इंझमाम उल हक काय म्हणाला?


पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकने दावा केला होता की सामन्यादरम्यान चेंडूशी काहीतरी छेडछाड करण्यात आली होती, ज्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ऑस्ट्रेलियाच्या डावात चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यात यशस्वी झाला होता. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना इंझमाम म्हणाला होता, तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही की अर्शदीप सिंग जेव्हा 15 वे षटक टाकत होता तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होत होता. याचा अर्थ तो 12व्या-13व्या षटकापर्यंत तयार केला जात होता. पण अर्शदीप गोलंदाजीला आला तेव्हा चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला, पंचांनी डोळे उघडे ठेवून नीट लक्ष दिले पाहिजे होते. मी हे सांगतोय कारण जर पाकिस्तानने असे केले असते तर गोंधळ झाला असता, असं विधान इंझमाम उल हकने केला.


उपांत्य फेरीआधी रोहित शर्माचं प्रत्युत्तर-


रोहित शर्मा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवरील आरोप स्वीकारण्यास कोणत्याही प्रकारे तयार नव्हता. रोहित शर्मा म्हणाला, याला मी काय उत्तर देऊ? जर तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात खेळत असाल आणि विकेट कोरड्या असतील, तर चेंडू आपोआप रिव्हर्स स्विंग घेतो. चेंडू फक्त आमच्यासाठीच नाही तर सर्व संघांसाठी स्विंग होत असतो. कधी कधी डोकं वापरणंही गरजेचं असतं. विश्वचषक कुठे खेळवले जात आहेत हेही बघावं लागेल. सामने ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये खेळवले जात नाहीयत. मला इतकंच बोलायचं आहे, असं म्हणत रोहित शर्माने इंझमाम उल हकला प्रत्युत्तर दिलं. 


रोहित शर्माची संपूण पत्रकार परिषद-






टीम इंडिया पराभवाचा हिशेब चुकता करणार? 


2022 मधील याच दारुण पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ लयीत आहे. विराट कोहलीसारखा फलंदाज फ्लॉप जात असतानाही भारतीय संघाने लौकिकास साजेशी कामगिरी केली आहे. गुरुवारी इंग्लंडचा पराभव करत 16 महिन्यानंतर भारतीय संघ बदल घेत फायनलमध्ये धडक मारेल, अशी चाहत्यांना इच्छा आहे.


संबंधित बातम्या:


विमान लेट, फक्त एका तासाची झोप...; सेमी फायनल खेळण्यापूर्वी अफगाणिस्तानसोबत काय काय घडलं?


T20 World Cup 2024 Semi Final: 'भारत, इंग्लंड नव्हे...हा संघ टी20 विश्वचषक जिंकणार'; दिग्गजाच्या भविष्यवाणीने सर्व आर्श्चयचकीत


T20 World Cup 2024: IND vs ENG: भारत-इंग्लंडचा सामना खेळवल्या जाणाऱ्या गयानामध्ये महिन्याचे 23 दिवस कोसळतो पाऊस; सेमी फायनल रद्द होणार?