T20 World Cup 2024 Final: जसप्रीत बुमराह ठरला टी-20 विश्वचषकाचा 'Player Of The Tournament'; पुरस्कार मिळाल्यानंतर भावूक
2024 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद भारताने पटकावले आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. (फोटो- पीटीआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजसप्रीत बुमराह 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. या विश्वचषकात बुमराहने आठ सामन्यांत 15 विकेट्स घेतल्या आणि अनेक वेळा भारताला हरवलेले सामने जिंकून दिले. (फोटो- पीटीआय)
अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 षटकात 18 धावा देत 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेला 18 चेंडूत 22 धावांची गरज असताना बुमराहने 18व्या षटकात केवळ दोन धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. येथून भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. (फोटो- पीटीआय)
भारत चॅम्पियन बनल्यानंतर, बुमराह म्हणाला, सहसा मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आज माझ्याकडे फारसे शब्द नाहीत, मी सहसा खेळानंतर रडत नाही. परंतु आता मी भावूक आहे.(फोटो- पीटीआय)
बुमराह पुढे म्हणाला की, आम्ही अडचणीत होतो पण त्या स्टेजवरून जिंकण्यासाठी आम्ही खूप उत्साही होतो. माझे कुटुंब येथे आहे, आम्ही गेल्या वेळी जवळ आलो आणि आम्ही काम पूर्ण केले, तुमच्या संघाला अशा सामन्यात विजय मिळवून देण्यापेक्षा दुसरी कोणतीही चांगली भावना नाही. (फोटो- पीटीआय)
बुमराह म्हणाला, खूप छान वाटले आणि खूप पुढे विचार न करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मोठा दिवस येतो तेव्हा तुम्हाला ते करावेच लागेल, हे मला संपूर्ण स्पर्धेत स्पष्टपणे जाणवले. मी नेहमी एका वेळी एक चेंडू आणि एक षटकाचा विचार करतो, फार पुढचा विचार करत नाही. (फोटो- पीटीआय)