AUS vs SA T20 WC Final : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2022 स्पर्धेचा अंतिम सामना आज 26 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये खेळवला जाईल. केपटाऊनच्या ऐतिहासिक न्यूलँड्स मैदानावर हा जेतेपदाचा सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ प्रथमच ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होणार की ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम राहील, हे पाहणं आज महत्त्वाचं असेल. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात हीच जोडी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवू शकते.


सर्वोच्च धावांची भागीदारी


दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघातील लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स ही सलामीची जोडी महिला टी20 विश्वचषकात आतापर्यंतची सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे. या सलामीच्या जोडीने T20 विश्वचषकात डावाची सुरुवात करताना सर्वाधिक 299 धावा केल्या आहेत. आयसीसी महिला T20 विश्वचषक इतिहासातील ही दुसरी सर्वात यशस्वी सलामीची जोडी आहे. याआधी 2020 टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनी आणि अॅलिसा हिली यांनी डावाची सुरुवात करताना 352 धावा जोडल्या होत्या. अंतिम सामन्यात पुन्हा एकदा ताजमिन ब्रिट्स आणि लॉरा वोल्वार्ड यांनी चांगली भागीदारी करण्यात यश मिळवले, तर ऑस्ट्रेलियाचे आव्हान आणखी वाढेल.


दक्षिण आफ्रिकेसाठीही रस्ता खडतर


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा T20 रेकॉर्ड जबरदस्त आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. हे सर्व सामने जिंकण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला. अलीकडेच या विश्वचषकात खेळल्या गेलेल्या सामन्यात कांगारू संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या भक्कम विक्रमावरून दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीतील मार्ग सोपा नसेल हे दिसून येते. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषक जिंकणार की ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


कधी, कुठे पाहाल सामना?


ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हा महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (Australia vs South Africa WC Final) आज अर्थात, 26 फेब्रवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धा तास आधी नाणेफेक होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हा अंतिम सामना महिला संघांमधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर (Newlands Cricket Stadium) होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   



कसे असू शकतात दोन्ही संघ? 


दक्षिण आफ्रिका संभाव्य इलेव्हन : लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, सुने लुस (कॅप्टन), क्लो ट्रायॉन, अनेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा


ऑस्ट्रेलिया संभाव्य इलेव्हन : अ‍ॅलिसा हिली, बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅश्ले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डार्सी ब्राउन






हे देखील वाचा-