IPL 2023 : आयपीएलच्या 16 हंगामाला (IPL 2023) 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. गुजरात आणि चेन्नई या सामन्याने आयपीएल 2023 ला सुरुवात होणार आहे. सर्व दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपलं करिअर घडवलं आहे. आयपीएलने भारताला अनेक विस्फोटक आणि प्रतिभावंत खेळाडू दिले आहेत. आयपीएलमध्ये पुढील पाच वर्षात कोणते खेळाडू चमकू शकतात, असा प्रश्न स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात विचारण्यात आला होता. यावेळी सौरव गांगुलीने पुढील पाच वर्षात आयपीएलमध्ये कमाल करणाऱ्या पाच खेळाडूंची नावे सांगितली.
पृथ्वी शॉ, ऋषभ पंत या दिल्लीच्या दोन खेळाडूंची नावे गांगुलीने पहिल्यांदा घेतली. या दोन्ही खेळाडूंकडे खूप प्रतिभा असल्याचं गांगुलीने सांगितलं. त्याशिवाय गांगुलीने चन्नईच्या ऋतुराज गायकवाड याचेही नाव घेतले. ऋतुराज गायकवाडकडे प्रतिभा प्रचंड आहे, तो कशा पद्धतीने स्वत:वर काम करतो, हे पाहावे लागेल, असे गांगुली म्हणाला. त्याशिवाय गांगुलीने या यादीत वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचेही नाव घेतले. उमरान मलिक याच्याकडे प्रचंड वेग आहे, त्यामुळे भविष्यात तो मोठा गोलंदाज होऊ शकतो. यावेळी हरभजनसिंह याने गांगुलीला युवा शुभमन गिल याची आठवण करुन दिली. त्यावर गांगुली म्हणाला.. हो नक्कीच गिल याचं नाव माझ्या डोक्यातून गेले होते. शुभमन गिल याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, भविष्यात तो मोठा खेळाडू होऊ शकतो.. त्याशिवाय गांगुली सूर्यकुमार यादव याचे नाव घ्यायला विसरला नाही, गांगुली म्हणाला की सूर्यकुमार यादव युवा नाही, पण पुढील काही दिवस सूर्यकुमार यादवशिवाय आपले टी20 क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही...
काय म्हणाला दादा, पाहा व्हिडीओ
श्रेयस अय्यर, ईशानला विसरला दादा
पुढील पाच वर्षात कोणते खेळाडू आयपीएलमध्ये कमाल करु शकतात, या प्रश्नाचं उत्तर देताना गांगुलीने पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल आणि उमरान मलिक यांची नावे घेतली. पण गांगुली श्रेयस अय्यर, इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्या नावाचा विसर पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खेळाडू कमाल कामगिरी करत आहेत. हे खेळाडू आपपाल्या संघासाठी महत्वाची कामगिरी कामगिरी करतात.
Virat Kohli On MS Dhoni : विराटनं केलं धोनीचं कौतुक, म्हणाला माही माझी ताकद