T20 World Cup 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषकासाठी सज्ज झालीय. या स्पर्धेत भारतीय संघ नवीन जर्सी घालून मैदानात उतरणार आहे, ज्याला 'वन ब्लू' जर्सी म्हटले आहे. भारताची ही जर्सी नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी लाँच करण्यात आली होती. भारताच्या जर्सीवर सहसा तीन स्टार पाहायला मिळतात? परंतु, या नव्या जर्सीवर एकच स्टार दिसत आहे. तर, एकमेव वेस्ट इंडीज संघाच्या जर्सीवर दोन स्टार आहेत.
दरम्यान, भारतानं टी-20 विश्वचषकासाठी लॉन्च करण्यात आलेली जर्सी, आतापर्यंतच्या सर्वोत्तम जर्सींपैकी एक असल्याचं बोललं जातंय. टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर गडद आणि फिकट निळ्या रंगाची रचना करण्यात आलीय. जर्सीच्या डावीकडं बासीसीआयचा लोगो आहे. तर, जर्सीच्यासमोर नारिंगी रंगात भारत असं इंग्रजीमध्ये लिहलं गेलंय.
कालांतरानं क्रिकेटमधील बदल
सुरुवातीच्या काळात लाल चेंडूनं आणि पांढऱ्या जर्सीमध्ये क्रिकेट खेळलं जायचं. कालांतरानं या खेळात अनेक बदल झाले आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटचाही त्यात समावेश झाला. कसोटीत, संघ अजूनही पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळतो. परंतु,एकदिवसीय सामने आणि टी-20 सामन्यांसाठी खेळाडू रंगीत जर्सी घालून मैदानात उतरतात. आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटच्या जर्सीही वेगळ्या झाल्या. भारताची एकदिवसीय जर्सी ही टी-20 जर्सीपेक्षा वेगळी आहे. ज्यावर तीन स्टार आहेत.
भारताच्या टी-20 जर्सीवर एकच स्टार का?
भारताच्या टी-20 जर्सीवर एकच स्टार आहे, जो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघानं 2007 मध्ये जिंकलेल्या टी-20 विश्वचषकाची आठवण करून देतो. तेव्हापासून भारताला टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. भारतीय संघानं आतापर्यंत फक्त एकदाच टी-20 विश्वचषक जिंकला आहे, ज्यामुळं त्यांच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या अगदी वर एक स्टार बनवण्यात आलाय.
कोणत्या संघाच्या जर्सीवर किती स्टार?
वेस्ट इंडीज हा एकमेव संघ आहे, ज्यानं सर्वाधिक दोन वेळा टी-20 विश्वचषक जिंकलाय. त्यांनी 2012 आणि 2016 च्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलंय. त्यानंतर भारत (2007), पाकिस्तान (2009), इग्लंड (2010), श्रीलंका (2014) आणि ऑस्ट्रेलिया (2021) यांनी प्रत्येकी एक-एक टी-20 विश्वचषक जिंकला आहे. वेस्ट इंडीजच्या संघानं सर्वाधिक दोन टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळं त्यांच्या जर्सीवर दोन स्टार आहेत. तर, अन्य टी-20 विश्वचषक विजेत्या संघाच्या जर्सीवर एक स्टार आहे.
हे देखील वाचा-