T20 World Cup 2021: विश्वचषकातील 19 व्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडला 5 विकेट्सने (Pakistan vs New Zealand) पराभूत केले. शारजाह क्रिकेट स्टेडिअमवर (Sharjah Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 विकेट्स गमावून 134 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेले लक्ष्य पाकिस्तानने 19 व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानच्या संघाचे एकूण 4 गुण झाले आहेत.


दरम्यान, प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानच्या आसिफ रौफच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अशरक्ष: गुडघे टेकले. न्यूझीलंडच्या संघाकडून मार्टील गप्टील (17 धावा, 20 बॉल), डॅरिल मिशेल (27 धावा, 20 बॉल), केन विल्यमसन (25 धावा, 26 बॉल), जेम्स नीशम (1 धाव, 2 बॉल), डेव्हॉन कॉनवे (27 धावा, 24 बॉल), ग्लेन फिलिप्स (13 धावा, 15 बॉल), टीम सेफर्ट (8 धावा, 8 बॉल) आणि मिचेल सॅन्टनर (6 धावा, 5 बॉल) केला. ज्यामुळे न्युझीलंडच्या संघाला 134 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून हरिस रौफने आक्रमक गोलंदाजी करीत 4 विकेट्स मिळवल्या. तर, शाहीन आफ्रीदी, इमाद वसीम आणि मोहम्मद हाफीज यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाकडून मोहम्मद रिझवान (33 धावा, 34 बॉल), बाबर आझम (9 धावा, 11 बॉल), फखर झमान (धावा, 17 बॉल), शोएब मलिक (26 धावा, 20 बॉल), इमाद वसीन (11 धावा, 12 बॉल) आणि असीफ अली (27 धावा, 12 बॉल) केल्या. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाला 5 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडच्या संघाकडून ईश सोडीने 2 विकेट्स पटकावले. तर, मिचेल सॅन्टनर, टीम साऊथी, आणि ट्रेन्ट बोल्ड यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवता आली. 


विश्वचषकाच्या सुपर 12 च्या फेरीत भारतीय संघ 'ब' गटात आहे. दरम्यान, न्यूझीलंडला पराभूत करून पाकिस्तान 'ब' गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. पाकिस्तानचे आता 4 गुण झाले. तर, सोमवारी पार पडलेल्या स्कॉटलँड विरुद्ध सामन्यात अफगाणिस्तान ने 130 धावांनी विजय मिळवून त्यांचा रनरेट बलाढ्य केला आहे. यामुळे अफगाणिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यात भारताचा मोठ्या रनरेटने पराभव झाला. ज्यामुळे भारताची गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर घसरण झाली. पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध मिळवलेल्या विजयाचा भारताला फायदाच झाला, असे बोलणे वावगं ठरणार नाही. कारण, न्यूझीलंडच्या विजयाने गुणतालिकेतील समीकरण बदलून गेले असते. तसेच पुढील सामन्यात भारताला चांगली कामगिरी करून दाखवणे गरजेचे आहे. भारताचे पुढील सामने न्यूझीलंड, अफगाणिस्तान, नामीबिया आणि स्कॉटलॅंडशी होणार आहे. 


संबंधित बातम्या