नवी दिल्ली : तब्बल 29 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला आणि पाकिस्तानच्या आनंदाला पारावार उरला नाही. ही घटना पाकिस्तानमध्ये एका जल्लोषाप्रमाणे साजरी केली जात असून त्यातूनच वेगवेगळी मुक्ताफळं उधळली जात आहेत. पाकिस्तानच्या मंत्र्याने याला धर्माचा रंग दिला असल्याची घटना ताजी असतानाच माजी क्रिकेटपटू वकार युनिसने धार्मिक वक्तव्य केलं आहे. मोहम्मद रिझवानने हिंदूंच्या मध्ये जाऊन नमाज पठण केलं तो आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं वक्तव्य वकार युनिसने केलं आहे. वकार युनिसचं वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी असून ते आपलासाठी निराशाजनक असल्याचं हर्षा भोगले यांनी म्हटलंय.
मोहम्मद रिझवानने सामना सुरु असताना मैदानातच नमाज पठण केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना वकार युनिस म्हणाला होता की, हिंदूंच्या समोर मोहम्मद रिझवानने नमाज पठण केलं हा आपल्यासाठी खास क्षण होता. त्याला उत्तर देताना हर्षा भोगले यांनी म्हटलंय की, "वकार युनिसचे हे वक्तव्य हे अत्यंत निराशाजनक आहे. अशा पद्धतीची वक्तव्यं करुन अनेकांनी खेळाच्या भावनेला खाली खेचण्याचं काम केलं आहे. या पद्धतीचे वक्तव्यं ही घातक आहेत."
पाकिस्तानच्या मंत्र्याने दिला धार्मिक रंग
पाकिस्तानच्या विजयानंतर लगेचच शेख रशिद यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एका
टी-20 विश्वचषकात भारताची पराभवाने सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने (India Vs Pakistan) भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. भारताकडून मिळालेल्या 152 धावांचे लक्ष्य कर्णधार बाबर आझम आणि त्याचा सहकारी मोहम्मद रिझवानने सहज पूर्ण केले. पाकिस्तान विरोधातल्या या पराभवामुळे भारताचा विजयी रथ तब्बल 29 वर्षांनंतर रोखला गेला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी एक फोटो ट्विट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तान विरोधात पराभव झाल्यानंतर भारताचा पुढील सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सोबत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- India vs Pakistan : भारताविरोधातील पाकिस्तानचा विजय हा 'इस्लामचा विजय'; पाकिस्तानच्या मंत्र्याची मुक्ताफळं
- T20 World Cup : पाकनं 'मौका' साधला! पंतप्रधान इम्रान खान यांचंही सेलिब्रेशन, म्हणाले, देशाला तुमचा अभिमान
- Ind vs Pak: पाकिस्तानी ओपनर रिझवानचं मैदानावर नमाज पठण, शोएब अख्तरनं शेअर केला व्हिडीओ, म्हणाला...