Mohsin Naqvi On T20 World Cup & Pakistan Cricket Team लाहोर : यंदा टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडून आयोजित केला जाणार आहे. या वर्ल्ड कपची सुरुवात 1 जूनपासून होणार असून 30 जूनला फायनल होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर करण्याची मुदत 1 मे ही होती. मात्र, पाकिस्ताननं दुखापतींचं कारण देत अद्याप संघ जाहीर केलेला नाही. पाकिस्तान त्यांचा टी-20 वर्ल्डकपचा संघ 25 मे पर्यंत जाहीर करेल. जर पाकिस्तानच्या संघानं 25 मे पर्यंत संघ जाहीर न केल्यास त्यांचा संघ वर्ल्ड कपमधून बाद होऊ शकतो. 


पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकल्यास किती बक्षीस मिळणार?


पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये अ गटात आहे. या गटात भारत देखील आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  जर, पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी ठरलं तर त्यांच्या खेळाडूंना 2.77 कोटी रुपये दिले जातील असं ते म्हणाले. मोहसीन नकवी यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या टीमच्या खेळाडूंची भेट घेतली.  


पाकिस्तानचा संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये सराव करत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी खेळाडूंची भेट घेतल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मोहसीन नकवी पाकिस्तानच्या खेळाडूंशी चर्चा करताना दिसून येतात.  


भारत पाकिस्तान आमने सामने


टी- 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जून रोजी होणार आहे. या मॅचकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  


पाकिस्तान आयरलँड आणि इंग्लंडविरुद्ध खेळणार  


टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानची टीम आयरलँड आणि इंग्लंड विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पाकिस्तानची टीम यानंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होईल. काही दिवसांपूर्वी झालेल्या मालिकेत न्यूझीलंडनं पाकिस्तानवर वर्चस्व ठेवलं होतं.  


1 जूनपासून रंगणार टी-20 वर्ल्डकपचा थरार


यंदा टी-20 वर्ल्डकपच्या आयोजनाचा मान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान हे  दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. भारतानं पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करुन विजयावर नाव कोरलं होतं.  


संबंधित बातम्या : 


CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जला दणका,28 धावांनी दणदणीत विजय, गुणतालिकेत उलटफेर


Virat Kohli : सुनील गावसकरांनी कोहलीला झापलं, विराटची बाजू घेत पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची बॅटिंग