Shoaib Malik Fifty: बाबर आझमचा पाकिस्तान संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सलग पाचवा विजय साजरा केला. विश्वचषकाच्या दुसऱ्या गटात पाकिस्ताननं स्कॉटलंडचा धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक (Shoaib Malik) ने वयाच्या 40व्या वर्षीही वादळी खेळी केली. मलिकने अवघ्या 18 चेंडूत 54 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. यावेळी शोएब मलिकने 6 षटकार आणि 1 चौकार अशी तुफान फलंदाजी केली.


शोएबच्या या शानदार खेळीचा आनंद त्याची पत्नी सानिया मिर्झा (Sania Mirza) नेही घेतला. ती आपल्या मुलासोबत स्टँडमध्ये उपस्थित होती आणि शोएबच्या वादळी खेळीवर ती आनंदी झालेली पाहायला मिळाली. तिने स्टँडमध्ये उभं टाळ्या वाजवून शोएबचं अभिनंदन केलं. यादम्यानचे सानियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.










शोएब मलिकची केएल राहुलशी बरोबरी  


ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक करण्यात शोएब मलिकने भारताचा सलामीवीर केएल राहुलची बरोबरी केली आहे. राहुलनेही स्कॉटलंडविरुद्ध 18 चेंडूत पन्नास धावा पूर्ण केल्या आहेत. तर शोएब मलिकने स्कॉटलंडविरुद्ध पाकिस्तानच्या डावातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.


पाकिस्तानचा स्कॉटलँडवर दणदणीत विजय


टी-20 विश्वचषकाच्या 41 सामन्यात पाकिस्तानच्या संघानं स्कॉटलँड (Pakistan Vs Scotland) 77 धावांनी पराभूत केलंय. शारजाह क्रिकेट मैदानात (Sharjah Cricket Stadium) हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून स्कॉटलँडसमोर 190 धावांचं लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलँडचा संघ डगमताना दिसला. पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलँडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. स्कॉटलँडच्या संघाला 20 षटकात विकेट्स गमावून धावा करता आल्या.


प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून मुहम्मद रिझवान (19 बॉल 15 धावा), बाबर आझम (47 बॉल 66 धावा), फखर जमान (13 बॉल 8 धावा), मुहम्मद हाफीज (19 बॉल 31 धावा), शायेब मलिक (18 बॉल 53 धावा, नाबाद) आणि असीफ अलीने 4 बॉल खेळून 5 धावा केल्यात. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाने 20 षटकात 189 धावांचा डोंगर उभा केला. स्कॉटलँडकडून क्रिस ग्रीव्जनं दोन विकेट्स घेतल्या. तर, हम्झा ताहिर आणि सफयान शरीफ यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.  


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलँडच्या संघाची सुरुवात खराब झाली. जॉर्ज मुन्से (31 बॉल 17), काइल कोएत्झर (16 बॉल 9), मॅथ्यू क्रॉस (8 बॉल 5 धावा), रिची बेरिंग्टन (37 बॉल 54 धावा), डायलन बज (2 बॉल 0 धाव), मायकेल लीस्क (14 बॉल 14 धावा), ख्रिस ग्रीव्ह्ज (12 बॉल 4 धावा), मार्क वॉटने 3 बॉलमध्ये 2 धावा केल्या. ज्यामुळे स्कॉटलँडला 20 षटकात 6 विकेट्स गमावून 117 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शदाब खाननं 2 विकेट्स घेतल्या. तर, शाहिन आफ्रिदी, हारिफ राऊफ आणि हसन अली यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


संबंधित बातम्या : 


ICC T20 World Cup : भारत-पाक सामन्याआधी सानिया मिर्झा सोशल मीडियापासून दूर; जाणून घ्या कारण


सानिया मिर्झाने 4 महिन्यांमध्ये घटवलं 26 किलो वजन; पाहा व्हिडीओ


Sania Mirza on Wimbledon: सानिया मिर्झाचे आई म्हणून तिच्या पहिल्या विम्बल्डनमध्ये विजयी पुनरागमन