ICC T20 World Cup : भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना 24 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकवेळी प्रमाणे या सामन्यापूर्वीही चर्चांना उधाण आलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याआधी सानिया मिर्झाला (Sania Mirza) अनेकदा ट्रोल केले गेले आहे. भारत-पाक सामन्यात ती कोणाला पाठिंबा देते यावरुन चाहते तिला ट्रोल करतात. मात्र, यावेळी असे काही होण्याआधी, भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


सानिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. सानिया मिर्झाने शेअर केलेल्या व्हिडिओवर असे लिहिले आहे की, 'भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दिवशी मी सोशल मीडिया आणि टॉक्सिसिटी (विषारी वातावरण) पासून गायब राहीन.'


यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, की बाय-बाय. भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगनेही सानिया मिर्झाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. त्याने "चांगली कल्पना" अशी कमेंट केली आहे.




भारत-पाक सामन्यात मैदानात जो तणाव पहायला मिळतो. तसाच मैदानाबाहेर दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमधील कमेंट आणि सामन्याबद्दल सोशल मीडियावर वाद पहायला मिळतो. याच कारणामुळे भारताची टेनिस स्टार खेळाडू सानिया मिर्झाने या सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.


सुपर 12 सामने : 



  • 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता 

  • 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता