T20 International New Rule: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं (ICC) टी-20 क्रिकेटसाठी नव्या नियम जाहीर केले आहेत. आयसीसीनं स्लो ओव्हर रेटवर दंड आकारण्याचा नियम लागू केलाय. तसेच, सामन्यादरम्यान ड्रिंक्स इंटरव्हल घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. या महिन्यात वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यापासून ते लागू होतील.


नवीन नियमांनुसार, जर एखादा संघ ओव्हर रेटमध्ये निर्धारित वेळेपेक्षा मागे असेल, तर उर्वरित षटकांमध्ये संबंधित संघाच्या एका खेळाडुला 30 यार्डच्या बाहेर उभा राहता येणार नाही. सध्या, पॉवरप्लेनंतर पाच खेळाडू 30 यार्डच्या बाहेरून क्षेत्ररक्षण करतात. परंतु, नव्या नियमानुसार संघाकडून चूक झाल्यास केवळ चार खेळाडूंना 30 यार्डच्या बाहेर उभा राहून क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. 


आयसीसीनं निवेदनात काय म्हटलंय?
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओव्हर रेटचे नियम आधीच ठरलेले आहेत. या अंतर्गत, क्षेत्ररक्षण करणारा संघ शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू निर्धारित वेळेत टाकण्यात आला पाहिजे. जर एखाद्या संघाकडून उशीर झाला. तर उर्वरित षटकांमध्ये त्यांच्याकडे 30 यार्डच्या बाहेर एकापेक्षा कमी क्षेत्ररक्षक असतील. आयसीसी क्रिकेट समितीच्या शिफारशीनुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं आयोजित केलेल्या द हंड्रेड स्पर्धेत असा नियम लागू केला होता. सर्व फॉरमॅटमधील क्रिकेटचा समाना वेळेत पार पडावा, या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha