India vs England Test Series : आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, या मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुन्हा एकदा टी दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना या वर्षी एप्रिलमध्ये पदावरून काढून टाकण्यात आले होते. मंडळ नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या शोधात होते, परंतु एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीतही मंडळाला पर्यायी प्रशिक्षक सापडला नाही. या कारणास्तव, टी दिलीप संघासह इंग्लंडला जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर टीम इंडियात फेरबदल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये फेरबदल केले होते. दिलीप आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अभिषेक नायर कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला आणि आयपीएलमध्ये संघाच्या प्रशिक्षक स्टाफचा सदस्य होता. त्यांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
दिलीपची पुन्हा निवड का झाली?
खरं तर, टी दिलीप 3 वर्षांहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघासोबत आहे. त्याने 2021 मध्ये त्याचे पद स्वीकारले. दिलीप बहुतेक खेळाडूंना ओळखतो. अशा परिस्थितीत, बोर्डाला वाटते की त्याला मोठ्या मालिकेत निवडणे संघासाठी चांगले ठरेल. पण असे वृत्त आले होते की, बीसीसीआय परदेशी खेळाडूला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करू इच्छित होते. बरेच प्रयत्न केले, परंतु कोणी भेटलं नाही. दिलीपने एकदिवसीय वर्ल्ड कप आणि टी-20 वर्ल्ड कपदरम्यान उत्तम कामगिरी केली होती.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी : 20 ते 24 जून - हेडिंग्ले
दुसरी कसोटी : 2 ते 6 जुलै - एजबॅस्टन
तिसरी कसोटी : 10 ते 14 जुलै - लॉर्ड्स
चौथी कसोटी : 23 ते 27 जुलै - मँचेस्टर
पाचवी कसोटी : 31 जुलै ते 4 ऑगस्ट - द ओव्हल
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, करुण नायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अभिमन्यू ईश्वरन, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप.