IPL 2025 Qualifier 1 Mullanpur Weather Report : गुरुवारी मोहालीत पावसाची शक्यता आहे, या दिवशी पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियम (New PCA Stadium) येथे खेळला जाणार आहे. जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल आणि एलिमिनेटरच्या विजेत्याशी सामना करेल. पण जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला अंतिम फेरीत जाईल? आणि कोणता संघ क्वालिफायर 2 मध्ये जाईल? याबद्दल प्लेऑफचे नियम जाणून घेऊया...
आधी क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने हैदराबादमध्ये खेळवले जाणार होते, परंतु आयपीएलने अधिकृतपणे जाहीर केले होते की आता हे दोन्ही सामने मुल्लानपूर येथे हलविण्यात आले आहेत. प्लेऑफ सामने गुरुवारपासून सुरू होत आहेत. क्वालिफायर 1 हा सामना पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. आरसीबीने लखनऊला हरवून टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले होते.
जर क्वालिफायर-1 पावसामुळे रद्द झाला तर नियम काय आहे?
जर पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना रद्द झाला तर पंजाबला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. तर आरसीबीला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी क्वालिफायर-2 खेळावे लागेल. नियमांनुसार, पॉइंट टेबलमध्ये अव्वल संघाला प्राधान्य दिले जाते.
प्लेऑफ सामन्यांमध्ये राखीव दिवस आहेत का?
नाही, प्लेऑफ सामन्यांच्या राखीव दिवसाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या हंगामात आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला होता. परंतु बीसीसीआयने एक नवीन नियम आणला आहे, ज्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता खूपच कमी होते.
बीसीसीआयचा नवीन नियम काय आहे?
बीसीसीआयने आयपीएल 2025 सामन्यांच्या अतिरिक्त वेळेत 120 मिनिटे वाढवले आहेत, त्यानुसार संपूर्ण 20 षटकांचा सामना रात्री 9:30 वाजेपर्यंत सुरू करता येईल.
मोहालीत पावसाची शक्यता
मोहालीतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, गुरुवारी तापमान 36 अंश सेल्सिअस राहील. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु शुक्रवारी येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, या दिवशी एलिमिनेटर सामना होईल. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर येतील आणि पराभूत संघ बाहेर पडेल. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात तिसऱ्या आणि मुंबई चौथ्या स्थानावर आहे.
हे ही वाचा -