Cheteshwar Pujara scores rapid fifty against Nagaland: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत (Syed Mushtaq Ali Trophy 2022) भारताचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) आक्रमक रुप पाहायला मिळालं. सौराष्ट्रकडून (Saurashtra) खेळताना पुजारानं नागालँडविरुद्ध (Nagaland) सामन्यात 35 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या सामन्यात पुजारानं ज्याप्रकारे फलंदाजी केली, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल. त्यानं अवघ्या 27 चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. संयमी आणि सावध खेळीसाठी ओळखला जाणाऱ्या पुजारानं तडाखेबाजी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चेतेश्वर पुजाराच्या या खेळीच्या जोरावर सौराष्ट्र संघानं नागालँडसमोर विशाल लक्ष्य ठेवलं.


ट्वीट-






 


सौराष्ट्राची दमदार फलंदाजी
एलिट ग्रुप डी सामन्यात सौराष्ट्रला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळालं. त्यानंतर सौराष्ट्रानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 203 धावा केल्या. पुजाराशिवाय समर्थ व्यासनंही या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. समर्थ व्यासनं 51 चेंडूत नाबाद 97 धावांची उत्कृष्ट खेळी केली. परंतु, निर्धारित षटकामुळं त्याला आपलं शतक पूर्ण करता आलं नाही. ज्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर निराशा पाहायला मिळाली.


शेल्डन जॅक्शनची निराशाजनक कामगिरी
चेतेश्वर पुजारा  आणि समर्थ व्यास या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर सौराष्ट्रानं 200 चा आकडा ओलांडला. पुजारानं आपल्या खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. तर, समर्थच्या बॅटीतून सात चौकार आणि तितकेच षटकार निघाले. पण शेल्डन जॅक्शननं नराशाजनक कामगिरी केली. त्याला सहा चेंडूत फक्त तीन धावा करता आल्या. 


मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉही चमकला
मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पहिलं शतक झळकावलं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी (14 ऑक्टोबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात शॉनं आसाम विरुद्ध 46 चेंडूत शतक ठोकलं. याच सामन्यात पृथ्वी शॉनं अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. 


हे देखील वाचा-