Team India : भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या दमदार फॉर्ममध्ये असणारा खेळाडू म्हटलं तर फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्याने टी20 विश्वचषकात त्यानंतर आता न्यूझीलंड दौऱ्यात कमाल कामगिरी करत टी20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. एकदिवसीय संघातही सूर्या खेळला असला तरी कसोटी टीममध्ये अजून त्याला संधी मिळालेली नाही. अशामध्ये आता आगामी भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) कसोटी मालिकेत त्याला संधी मिळू शकते. 

याचे कारण या दौऱ्यात भारतीय संघात समावेश असलेल्या रवींद्र जाडेजाची दुखापत ठिक झाली नसल्याने एकदिवसीय संघातून त्याला वगळलं आहे. त्याच्या जागी शाहबाज अहमदला संधी मिळाली आहे. कसोटी सामने वन डेनंतर असल्याने अद्याप जाडेजा त्यातूनही वगळला जाणार की नाही हे स्पष्च झालं नसलं तरी जर जाडेजा कसोटी संघातही नसल्यास सूर्यकुमारला संधी मिळू शकते. सध्या सूर्या कमाल फॉर्मात असल्याने त्याला कसोटी संघात संधी मिळावी अशी अनेक भारतीय चाहत्यांची मागणी आहे. 

सध्या जाहीर बांग्लादेशविरुद्धचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.  

भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर  झहूर अहमद चौधरी स्टेडियम
दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर  शेर ए बांग्ला, ढाका

एकदिवसीय संघात बदल

बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जाडेजा भारतीय संघाचा भाग असणार नाही. दुखापतीमुळे त्याला टीम इंडियातून वगळावे लागले आहे. याशिवाय यश दयाल देखील दुखापतीमुळे भारतीय संघाचा भाग असणार नाही. यांच्या जागी कुलदीप सेन आणि शाहबाज अहमद यांना संघात स्थान दिलं आहे. 

हे देखील वाचा-