एक्स्प्लोर

T20I Rankings: आयसीसीची टी-20 क्रमवारीका जाहीर; सूर्यकुमार चमकला, रिझवान आणि बाबरचं नुकसान

T20 International Men's Batsmen Rankings: न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डेवॉन कॉन्वे हा पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्यासह टॉप-5 मध्ये सामील झालाय.

T20 International Men's Batsmen Rankings: आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीनुसार, भारताचा स्टार फलंदाज सूर्याकुमार यादव (Suryakumar Yadav) यादीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज डेवॉन कॉन्वे हा पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्यासह टॉप-5 मध्ये सामील झालाय. आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी जगातील नंबर वन टी-20 फलंदाज बनण्याच्या शर्यतीला वेग आलाय. 

ट्वीट-

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या टी-20 ट्राय-सीरीजमध्ये कॉन्वे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सध्या तो आयसीसी टी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत टॉप-5 मध्ये सामील झालाय. त्यानं बांग्लादेशविरुद्ध 70 आणि पाकिस्तानविरुद्ध 49 धावा करून आरोन फिंच आणि डेविड मलानला मागं सोडलं. त्याचे सध्या 760 रेटिंग गुण आहेत. 

रिझवानची 15 रेटिंग गुणांसह घसरण
रिझवाननं नाबाद 78 धावांच्या खेळीसह ट्राई सीरीजची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याच्या बॅटमधून कोणतीही मोठी धावसंख्या पाहायला मिळालं नाही. परिणामी, रिझवानची 15 रेटिंग अंकानं घसरण झाली आहे. तर, बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर आयसीसीच्या टी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मार्क वूड आणि रीस टोप्ले यांची मोठी झेप
दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि रीस टोप्लेनं क्रमावारीत मोठी झेप घेतली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानात पुनरागमन करणाऱ्या वूड सध्या दमदार गोलंदाजी करताना दिसत आहे. आयसीसी क्रमावारीत 14 स्थानांनी झेप घेऊन तो 18 व्या स्थानी पोहचलाय. 

एकदिवसीय क्रमवारीत भारताच्या खेळाडूंचं काय?
एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने मालिका जिंकल्यानंतरही शिखर धवनची सहा स्थानांनी घसरला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसह रोहित शर्मा 17व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दोघांचीही क्रमवारीत थोडी घसरण झाली. त्यांच्यापुढं एकमेव भारतीय फलंदाज आहे. क्विंटन डी कॉकच्या खराब फॉर्ममुळे त्याला एक स्थानाचं नुकसान झालंय. ज्यामुळं इमाम-उल-हकला एकदिवसीय क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत क्रमांक 2 वर पोहोचण्यास मदत झाली. श्रेयस अय्यर, हेनरिक क्लासेन आणि संजू सॅमसन यांनी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या 100 मध्ये पोहोचले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट घेत कुलदीप यादवनं सात स्थानांनी झेप घेत अव्वल 25 मध्ये पोहोचले आहे.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu's Remark: 'संभाजी महाराज सासरच्यांकडून मारले गेले, Aurangzeb बदनाम झाला', बच्चू कडूंचा खळबळजनक दावा
Eknath Shinde on Mahayuti : सगळ्या निवडणुका महायुतीच जिंकेल, एकनाथ शिंदेंचा विश्वास
Sanjay Raut : नरकासुर गुवाहाटीमधून उगम पावला, गद्दार नरकासुरांना जनता चिरडणार,राऊतांचा घणाघात
Sanjay Shirsat : 'सरकारचा पैसा आहे, बापाचं काय जातंय?'; पालकमंत्री शिरसाटांचं वादग्रस्त वक्तव्य
Dharashiv Voter List Fraud: परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणी? एकाच पत्यावर 37 मतदारांची नोंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे निधन; जनसंघापासून भाजपचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Bacchu Kadu: संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
Embed widget