एक्स्प्लोर

Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO

Suryakumar Yadav on India Comeback : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियापासून बाहेर आहे.

Suryakumar Yadav on India Comeback : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि माजी टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियापासून बाहेर आहे. मात्र, संघात पुनरागमन करण्यासाठी सूर्यकुमारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मैदानापासून दूर असला तरी त्याची मेहनत सुरू असून, योग्य संधी मिळाल्यास टीम इंडियात पुनरागमन करण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवला टीम इंडियातील पुनरागमनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सूर्याने अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “पाहा, मी मेहनत तर पूर्ण करत आहे. सगळं चांगलं झालं तर चांगलंच होईल.” सूर्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. मात्र, त्याच्यासमोरचं आव्हान सोपं नसणार आहे.

टी-20 विश्वचषक जिंकूनही संघाबाहेर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2026 च्या टी-20 विश्वचषकावर कब्जा केला होता. भारतीय संघाने जेतेपद पटकावलं आणि सूर्यकुमारच्या नेतृत्वावरही कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, विशेष म्हणजे त्या अंतिम सामन्यानंतर सूर्यकुमार यादवचा टीम इंडियासाठीचा प्रवास काही काळासाठी थांबला. विश्वचषक जिंकल्यानंतर त्याला टी-20 कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे टी-20 संघाची धुरा सोपवण्यात आली. कर्णधारपद गेल्यानंतर सूर्यकुमारला संघातूनही वगळण्यात आलं. त्यामुळे विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधारालाच पुढील मालिकेत संघाबाहेर बसावं लागल्याने क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

कर्णधार म्हणून यश, पण फलंदाज म्हणून अपेक्षाभंग 

सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून संघाला मोठं यश मिळवून दिलं असलं, तरी फलंदाज म्हणून त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. 2026 टी-20 विश्वचषकात सूर्याने 9 सामने खेळताना 9 डावांत 242 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 136.72 होता. आकडे वरवर पाहता फार खराब वाटत नसले, तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आणि बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विशेषतः अंतिम सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक फलंदाजीवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले. टीम इंडियाने विश्वचषक जिंकला असला तरी सूर्याच्या बॅटमधून सातत्याने धावा न आल्याने निवड समितीसमोर त्याला संघात कायम ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला.

IPL 2026 मध्येही बॅट शांत

सूर्यकुमार यादवसाठी 2026 चा आयपीएल हंगामही फारसा समाधानकारक ठरला नाही. आयपीएलमध्ये त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र, त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. 2026 च्या आयपीएलमध्ये सूर्यकुमारने 13 सामने खेळले आणि 13 डावांत 20.76 च्या सरासरीने 270 धावा केल्या. एकेकाळी टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमारकडून अशा कामगिरीची अपेक्षा नव्हती. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावरही प्रश्न निर्माण झाले.

हे ही वाचा -

Eng vs Pak 2nd Test : इम्रान खानच्या मुलांचा 18 मिनिटांचा इंटरव्ह्यू अन् लॉर्ड्सवर खळबळ! इंग्लंड-पाकिस्तान सामना थांबवण्याची PCBची धमकी; नेमकं काय घडलं?

किरण गणपत महानवर हे मूळचे पुण्याचे असून, त्यांना डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात सकाळमधून केली. सकाळमध्ये सुमारे अडीच वर्षे मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम करताना त्यांनी क्रीडा पत्रकारिता आणि डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव व कौशल्य विकसित केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 पासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. क्रीडा पत्रकारिता हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. 

गेल्या काही वर्षांत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. यामध्ये फिफा वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स, क्रिकेट वर्ल्ड कप, महिला क्रिकेट वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, आयपीएल, तसेच भारतीय क्रिकेट संघाचे विविध देशांतील दौरे आणि इतर प्रमुख क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्र केसरी, प्रो कबड्डी लीग आणि हॉकीसारख्या स्पर्धांचेही त्यांनी वार्तांकन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील आवड, लेखनशैली आणि डिजिटल माध्यमांमधील अनुभव यांच्या जोरावर ते वाचकांपर्यंत रोचक, अचूक आणि माहितीपूर्ण बातम्या व अपडेट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, प्रभावी सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती योग्य वेळी पोहोचवणे याला त्यांचे विशेष प्राधान्य असते.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
Team India : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, श्रीलंकेविरुद्ध दोघे खेळणार, वनडे मालिका कधी सुरु होणार?
विराट आणि रोहितच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, हिटमॅन आणि किंग कोहली लवकरच मैदानात
Yashasvi Jaiswal Catch : मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
मागे धावला, हवेत झेपावला अन् एका हाताने यशस्वी जैस्वालने अशक्य असा कॅच पकडला! टीम इंडियाचे सगळे खेळाडू चकित, कॉनवेही पाहतच राहिला, VIDEO
IND vs NZ 2nd Test Day-3 Stump : जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
जुरेलची एकाकी झुंज, टीम इंडियाची लाज वाचवली! बुमराहचीही प्रतीक्षा संपली; तरी न्यूझीलंडच वरचढ, तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्ड आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्ड आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Nagpur Crime News: 8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
8 वर्षीय चिमुरडीवर 60 वर्षीय नराधम वृद्धाकडून अत्याचार; हात पाय तोडण्याची दिली धमकी अन्..., नागपुरातील शॉकींग घटना
Embed widget