IPL 2023, SRH vs KKR : सध्या आयपीएलचा 16 वा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 मधील 19 व्या सामन्यात सनराजयर्स हैदराबाद (SRH) संघाने शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघावर दणदणीत विजय मिळवला. कोलकाता संघाला हैदराबादकडून 23 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हैदराबाद संघाने कोलकाताला 229 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी कोलकाताची पुरती नाचक्की केली. कोलकाता संघांला 20 षटकांमध्ये फक्त 205 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना हैदराबाद संघाने मोठ्या धावसंख्येने जिंकला. या विजयानंतर गुणतालिकेत मोठ बदल झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादने मोठी झेप घेतली आहे.
हैदराबादच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा आणि गेल्या सामन्याचा हिरो रिंकू सिंह यांनी शानदार खेळी खेळली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. सनरायझर्स हैदराबादचा हा दुसरा विजय आहे. हैदराबाद संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, त्यामधील दोन सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडे 4 गुण आहेत. या विजयानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. हैदराबाद संघाने या विजयासह मोठी झेप घेतली आहे. हैदराबाद आता नवव्या क्रमांकावरून उडी घेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
टॉप 4 संघांमध्ये कोणताही फेरबदल नाही
कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, या विजयानंतरही टॉप 4 संघांमध्ये कोणताही फेरबदल झालेला नाही. राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्यानंतर अनुक्रमाने लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघ दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. तसेच चेन्नई सुपर किंग्स संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
कोणता संघ, कोणत्या स्थानावर?
आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने चार सामने खेळले आहेत त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत आणि एकामध्ये संघाचा पराभव झाला आहे. संजू सॅमसनचा संघ 6 गुण आणि चांगल्या नेट रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघही 4 सामन्यांत 6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गुजरात टायटन्स 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 4 गुणांसह चौथ्या, चेन्नई सुपर किंग्ज 4 गुणांसह पाचव्या, पंजाब किंग्स 4 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी हैदराबादच्या विजयानंतर आरसीबी आठव्या तर मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर घसरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स शेवटच्या गुणतालिकेत तळाशी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :