SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
South Africa vs Australia 1st Test Update : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.

South Africa vs Australia 1st Test Update In Marathi : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 ऑक्टोबरपासून डर्बनमधील किंग्समीड स्टेडियमवर सुरू झाला. 2 मधील सँडपेपर प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात खराब झाली. अशा परिस्थितीत अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने 25 धावांची खेळी करत कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.
स्टीव्ह वॉ यांचा विक्रम मोडला; स्मिथची मोठी झेप!
डर्बन कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 24 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 25 धावा केल्या. ही खेळी मोठी नसली, तरी त्याच्या कसोटी कारकिर्दीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या खेळीसह स्मिथने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांना मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले. स्मिथने 126 कसोटी सामन्यांतील 224 डावांमध्ये 10,945 धावा केल्या आहेत. तर स्टीव्ह वॉ यांनी 168 कसोटी सामन्यांमध्ये 10,927 धावा केल्या होत्या. आता या यादीत स्मिथच्या पुढे केवळ रिकी पाँटिंग आणि ॲलन बॉर्डर हे दोन दिग्गज फलंदाज आहेत. त्यामुळे भविष्यात या दोघांच्या विक्रमांना मागे टाकण्याची संधीही स्मिथकडे असेल.
In test cricket among Fab 5 Virat Kohli averages 49.50 runs per wicket in South Africa. Joe Root averages 50.21 runs per wicket in South Africa. Babar Azam averages 41.40 runs per wicket in South Africa. Kane Williamson averages 21 runs per wicket in South Africa. And Steve Smith averages 39 per wicket and 0.33 @ rr3sts per Tour in South Africa. The greatest of all time!!❤️ https://t.co/Jx1yt4CJkx
— Usman (@Usman_56Offical) October 9, 2026
ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज
- रिकी पाँटिंग – 13,378 धावा (168 सामने)
- ॲलन बॉर्डर – 11,174 धावा (156 सामने)
- स्टीव्ह स्मिथ – 10,945 धावा (126 सामने)
- स्टीव्ह वॉ – 10,927 धावा (168 सामने)
- डेव्हिड वॉर्नर – 8,786 धावा (112 सामने)
पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड अवघ्या 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर निक मॅडिसनला खातेही उघडता आले नाही. तो 33 चेंडूंचा सामना करून शून्यावर माघारी परतला. अवघ्या 24 धावांत दोन विकेट गमावल्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, पहिल्या सत्रातील अखेरच्या चेंडूवर लॅबुशेन 37 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला. दुपारच्या जेवणानंतर स्मिथची विकेटही पडली. परिणामी, ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या. मात्र, अवघ्या 25 धावांच्या खेळीतही स्मिथने स्टीव्ह वॉ यांचा विक्रम मागे टाकत आपल्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
हे ही वाचा -




















